Amy Jackson Married to Ed Westwick wedding photos: ‘सिंग इज ब्लिंग’ फेम अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सनने ब्रिटिश अभिनेता आणि संगीतकार एडवर्ड जॅक पीटर वेस्टविकशी लग्न केलं आहे. इटलीतील अमाल्फी बीचवर या दोघांचे डेस्टिनेशन वेडिंग पार पडले. या लग्नात अ‍ॅमीचा पाच वर्षांचा मुलगा अँड्रियासही सहभागी झाला होता. दोघांनी ख्रिश्चन पद्धतीनुसार लग्न केले. अ‍ॅमी आणि एडवर्डने लग्नाचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

लग्नात अ‍ॅमी जॅक्सन आणि एडवर्ड वेस्टविक दोघेही खूप सुंदर दिसत होते. लग्नासाठी अ‍ॅमीने पांढरा गाउन ड्रेस निवडला तर एडवर्डने काळ्या पँटसह पांढरा सूट घातला होता. पहिल्या फोटोत एडवर्डने अ‍ॅमीला जवळ पकडून पोझ दिली आहे, तर दुसऱ्या फोटोत ते दोघेही कॅमेऱ्याकडे बघत पोझ देत आहेत. “प्रवास आता सुरू झाला आहे”, असं कॅप्शन देत एडवर्डने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Kiran Abbavaram Rahasya Gorak wedding photos
प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न, कूर्गमध्ये अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Dino Morea left movies now handling business
एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता
Gautam Rode Pankhuri Awasthy break up thoughts
सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Hungama 2 actress Pranitha Subhash blessed with baby boy
बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, तीन वर्षांपूर्वी बिझनेसमनशी केलंय लग्न
Abhishek Bachchan reacts on divorce rumors with Aishwarya Rai
ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन; म्हणाला…
Manu Bhaker's Father Statement on His Daughter and Neeraj Chopra Marriage Rumors
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेर-नीरज चोप्राची सोयरीक जुळली? मनूच्या वडिलांनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले, “नीरजला आम्ही…”

अ‍ॅमी जॅक्सन आणि एडवर्ड वेस्टविक या दोघांनाही चाहते नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहे. अ‍ॅमीच्या लग्नात रोहिणी अय्यर सहभागी झाली होती.

Amy Jackson and Ed Westwick
अ‍ॅमी जॅक्सन आणि एडवर्ड वेस्टविक (फोटो – इन्स्टाग्राम)

अ‍ॅमी जॅक्सन आणि एडवर्ड वेस्टविकने या वर्षी जानेवारीमध्ये एंगेजमेंट केली होती. त्यांनतर दोघांनी लंडनमध्ये एंगेजमेंट डिनर पार्टी आयोजित केली होती आणि जवळच्या मित्रांबरोबर त्यांच्या सेलिब्रेशन केले होते. त्यानंतर दोघेही आता इटलीत विवाहबंधनात अडकले.

एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता

मुलाचा जन्म अन् ब्रेकअप

३२ वर्षीय अ‍ॅमी जॅक्सनचं हे पहिलंच लग्न आहे, पण तिला पाच वर्षांचा मुलगा आहे. एडवर्ड वेस्टविकशी लग्न करण्यापूर्वी अ‍ॅमी (Amy Jackson Ex Boyfriend) बिझनेसमन जॉर्ज पानायियोटोसह रिलेशनशिपमध्ये होती. जानेवारी २०१९ मध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर अ‍ॅमीने मुलाला जन्म दिला. अँड्रियास जॅक असं त्याचं नाव आहे. जॉर्ज आणि अ‍ॅमी यांच्यात सतत मतभेद व्हायचे, त्यामुळे दोघांचे लग्न होण्याआधीच ब्रेकअप झाले. अ‍ॅमी एकटीच मुलाचा सांभाळ करते. अशातच अ‍ॅमीने एडवर्ड वेस्टविकला डेट करायला सुरुवात केली. २०२२ पासून हे दोघेही एकत्र आहेत, असं म्हटलं जातं.

प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न, कूर्गमध्ये अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

अ‍ॅमी जॅक्सनचे चित्रपट

अ‍ॅमी जॅक्सन (Amy Jackson Movies) ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने बॉलीवूड चित्रपटांबरोबरच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केलं आहे. २०१२ मध्ये ‘एक दिवाना था’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर तिच्याबरोबर मुख्य भूमिकेत होता. ‘येवाडू’, ‘ऑपरेशन फॉर्च्युन’, ‘थेरी’, ‘थंगमगन’, ‘मद्रासापट्टणम’, ‘देवी’, ‘गेथू’ हे तिचे काही गाजलेले चित्रपट आहेत.