बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे मावशी झाली आहे. अनन्याची चुलत बहीण अलाना पांडे हिने गोंडस बाळासा जन्म दिला आहे. अलाना ही चंकी पांडे यांचा भाऊ चिक्की पांडे आणि डॅनी पांडे यांची मुलगी आहे. अलान व आयव्हर मॅक्रे आई-बाबा झाले आहेत. अलानाने तिच्या इन्स्टाग्रामवर बाळाबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

अलानाने फोटोग्राफर व व्हिडीओग्राफर आयव्हर मॅक्रे याच्याशी १६ मार्च २०२३ रोजी मुंबईत लग्न केलं होतं. आता लग्नानंतर १५ महिन्यांनी अलाना आई झाली आहे. अलानाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. “अवर लिटिल एंजल इज हिअर” असं कॅप्शन देत अलानाने व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती बाळाला कुशीत घेऊन दिसतेय. नंतर व्हिडीओत ती पती आयव्हरला किस करताना दिसते.

small boy stuck in lift
VIDEO : “तू आई नाही; मूर्ख बाई आहेस”, महिला मैत्रिणींबरोबर गप्पा मारण्यासाठी थांबताच चिमुकला लिफ्टमध्ये शिरला; पाहून काळजाचा ठोका चुकेल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
chairperson vijaya rahatkar announces countrys first premarital counseling Centre opening in Nashik
नाशिकमध्ये महिलादिनी देशातील पहिले विवाहपूर्व समुपदेशन केंद्र, कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी पुढचं पाऊल
do you see the richest mother in the world
Video : जगातील सर्वात श्रीमंत आई पाहिली का? असे मुलं प्रत्येक आईच्या पोटी जन्माला आली पाहिजे; महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ होतोय व्हायरल
a young guy passed MPSC exam and become police
Video : “आई तुझा मुलगा पोलीस झाला”, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो; पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणांनी पाहावा हा व्हिडीओ
video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
poonam panday visits mahakumbh mauni amavasya
Video : “माझी सर्व पापं धुतली गेली”, पूनम पांडेने मौनी अमावस्येला गंगेत केले स्नान; महाकुंभातील चेंगराचेंगरीबद्दल म्हणाली…
Baby Girl Sharing food with Dad
‘म्हणून लेकीला घरची लक्ष्मी म्हणतात…’ उपाशी बापासाठी चिमुकलीने केलं असं काही की… VIDEO पाहून डोळे पाणावतील

“आम्ही कोणाच्या पोटी जन्मलो?” सरोगसीद्वारे जन्मलेली जुळी मुलं विचारतात प्रश्न; करण जोहर म्हणाला, “ही परिस्थिती…”

अलानाच्या या व्हिडीओवर बिपाशा बासू, अनुराग कश्यपची लेक आलिया कश्यप, सीमा सजदेह यांच्यासह चाहत्यांनी कमेंट्स करून शुभेच्छा दिल्या आहेत. अलानाने फेब्रुवारी महिन्यात ती आई होणार असल्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. त्यानंतर ती सातत्याने तिच्या बेबी बंपचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असायची. अलानाने तिला मुलगा होणार असल्याचंही फेब्रुवारी महिन्यात सांगितलं होतं. अलानाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मुंबईतील तिच्या घरी पार पडला होता. त्यावेळी अनेक बॉलीवूड कलाकार या कार्यक्रमाला गेले होते.

गरोदर असल्याने सोनाक्षी सिन्हाने केलं लग्न? अभिनेत्री प्रतिक्रिया देत म्हणाली, “आता बदल एवढाच…”

अलानाने व्हिडीओ शेअर करून तिला मुलगा होणार की मुलगी हे सांगितलं होतं. अलाना पतीबरोबर लॉस एंजेलिसमध्ये राहते. अमेरिकेत बाळाच्या जन्माआधी लिंग चाचणी करणे बेकायदेशीर नाही. त्यामुळेच अलानाने या व्हिडीओमध्ये मुलगा होणार की मुलगी ते सांगितलं होतं. आता तिची प्रसूती झाली असून तिने मुलाबरोबरचा एक गोंडस व्हिडीओ शेअर केला आहे.

Video: अमृता फडणवीस अन् लेक दिविजा सारखाच लूक करून पोहोचल्या अनंत-राधिकाच्या संगीतला, ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?

अनन्याची चुलत बहीण अलाना पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. २९ वर्षीय अलाना आधी लिव्ह इनमध्ये राहत होती, त्यानंतर तिने लग्नाचा निर्णय घेतला व मुंबईत लग्न केलं. तिच्या लग्नाला अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. तिच्या लग्नाचे काही सोहळे अभिनेता सोहेल खानच्या घरी झाले होते.

Story img Loader