Poonam Pandey Died at 32 : बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूनम पांडेचं सरव्हायकल कॅन्सर (गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग)मुळे निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. अभिनेत्रीच्या टीमने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून यासंदर्भात तिच्या चाहत्यांना माहिती दिली आहे. पूनमच्या आकस्मिक निधनामुळे बॉलीवूडकरांना मोठा धक्का बसला आहे.
पूनमने वयाच्या ३२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. “या कठीण काळात तुम्ही आम्हाला साथ द्या” अशी विनंती तिच्या टीमकडून करण्यात आली आहे. पूनमच्या निधनानंतर इन्स्टाग्रामवरील तिच्या शेवटच्या पोस्टवर चाहते कमेंट्स करत श्रद्धांजली वाहत आहेत. तिची शेवटची पोस्ट ३ दिवस जुनी आहे. यामध्ये अभिनेत्री गोव्यातील एका पार्टीत उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळत आहे.
पूनम तीन दिवसांपूर्वी तिच्या टीमसह गोव्यातील एका क्रुझ पार्टीला उपस्थित राहिली होती. या पार्टीमधील व्हिडीओ अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. दुर्दैवाने पूनमची ही पोस्ट शेवटची ठरली आहे. यानंतर तिच्या टीमने निधनाचे वृत्त शेअर केले आहे.
दरम्यान, ‘नशा’ या चित्रपटातून पूनम पांडेने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. याशिवाय २०११ मध्ये क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापूर्वी केलेल्या एका वक्तव्यामुळे पूनम सर्वाधिक चर्चेत आली होती.