करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेचे सध्या कौतुक केले जात आहे. चित्रपटात ‘ढाई किलो’ आणि ‘कुल्फी कुमार बाजेवाला’ फेम अभिनेत्री अंजली आनंदने रणवीर सिंहच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. अंजलीच्या भूमिकेचे नाव चित्रपटात ‘गायत्री’ असे आहे. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर अंजलीने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत बॉडी शेमिंग, सोशल मीडियावर केले जाणारे आक्षेपार्ह मेसेज यांसारख्या समस्यांवर भाष्य केले आहे.
हेही वाचा : “त्याला अभिनय क्षेत्रातील मुलीशी लग्न…”, स्पृहा जोशीने सांगितला नवऱ्याबद्दलचा किस्सा; म्हणाली…
अंजली आनंदने सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत बॉडी शेमिंगबद्दल आलेल्या अनुभवाविषयी सांगितले. अभिनेत्री म्हणाली, “मी १० वर्षांपूर्वी एका अभिनय कार्यशाळेत प्रवेश घेतला होता. तेव्हा काही लोक तू जाड असल्याने तुला काम नाही मिळणार असे म्हणायचे. आधी चित्रपटात जाड मुलींना केवळ बर्गर किंवा फ्रेंच फ्राईज खातेय असे दाखवले जायचे. लठ्ठ मुलींना फक्त अशाच भूमिका देणे चुकीचे आहे.”
अंजली पुढे म्हणाली, “जेव्हा मला पहिली मालिका मिळाली, तेव्हा काही लोकांनी सोशल मीडियावर मेसेज करून मला विचाराले. एका लठ्ठ मुलीला प्रमुख भूमिका कशी मिळू शकते? तू कोणाबरोबर तरी संबंध ठेवलेस म्हणून तुला काम मिळाले. हे मेसेज वाचून मला काय बोलावे सुचायचे नाही. एवढेच नव्हे तर, माझ्या फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट केल्या जायच्या. कोणाबरोबर संबंध ठेवले फक्त तरचं तुम्हाला काम मिळते का? या सगळ्या लोकांच्या मानसिकतेत बदल होणे प्रचंड आवश्यक आहे आणि अशा लोकांविषयी चर्चा करणे देखील मूर्खपणाचे लक्षण आहे.”
हेही वाचा : “तो माझा सासरा आहे पण…”, स्पृहा जोशीने दिली तिच्या आणि प्रथमेश लघाटेच्या नात्यावर प्रतिक्रिया, म्हणाली…
दरम्यान, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ यामध्ये अंजलीने साकारलेल्या गायत्रीच्या भूमिकाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. केवळ खाण्याच्या सवयीमुळे एखाद्या मुलीला गोलू म्हणणे किंवा जाड मुलीने इच्छेशिवाय लग्न करणे कसे चुकीचे आहे याबाबत हे पात्र भाष्य करते. ‘रॉकी और रानी’ चित्रपटाशिवाय अंजली ‘खतरों के खिलाडी’च्या १३ व्या पर्वात सहभागी झाली होती.