कलाकार मंडळी सध्या दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन करत आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेही या सणाचा आनंद लुटत आहे. अंकिता लग्नानंतरचे तिचे सगळेच पहिले सण अगदी उत्साहाने साजरे करताना दिसत आहे. तिची लग्नानंतरची ही पहिलीच दिवाळी आहे. पती विकी जैन व त्याच्या कुटुंबासह अंकिता दिवाळी साजरी करत आहे. यादरम्यान अंकिताने तिच्या घराचा एक व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. त्याचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
आणखी वाचा – Photos : खऱ्या आयुष्यात प्रथमेश परबला मिळाली प्राजू? गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
गेल्यावर्षी १४ डिसेंबरला अंकिता-विकीने थाटामाटात लग्न केलं. या दोघांच्या जोडीला चाहतेही भरभरून प्रतिसाद देतात. अंकिताने काही दिवसांपूर्वीच करवा चौथ हा सण साजरा केला. आता सासरी ती दिवाळी साजरी करण्यामध्ये रमली आहे. तिने आपल्या सासरच्या घराचा शेअर केलेला व्हिडीओ विशेष लक्षवेधी ठरत आहे.
पाहा व्हिडीओ
अंकिताचं सासरचं घर एखाद्या महालापेक्षा काही कमी नाही. तिने शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही याचा अंदाज येईल. अंकिताचं हे घर लायटिंग व फुलांनी सजवण्यात आलेलं आहे. याची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असणार हे व्हिडीओ पाहिल्यानंतर कळतं. तिच्या या घराच्या व्हिडीओला काही तासांमध्येच हजारो व्ह्युज मिळाले आहेत.
आणखी वाचा – Video : गाढ झोपलेल्या नवऱ्याबरोबर कतरिना कैफने केलं असं काही की…; बेडरूममधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
अंकिताने सोशल मीडियाद्वारे घराचा व्हिडीओ शेअर करताच चाहत्यांनीही विविध कमेंट केल्या आहेत. अतिशय सुंदर घर, तुझं सासर खूप मस्त आहे, तुला चांगलं कुटुंब मिळालं आहे अशा अनेक कमेंट तिच्या चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहून केल्या आहेत.