छोट्या पडद्यावरुन घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे जैन पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. अंकिता ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. तिने सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत तिच्या या नवीन प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चित्रपटातील फर्स्ट लूकचं पोस्टर शेअर केलं आहे. “ही गोष्ट सांगण्यासाठी मी किती दिवसांपासून थांबले होते. ‘स्वांतत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात मी मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे. प्रमुख भूमिका असलेला हा माझा पहिलाच चित्रपट आहे. हा प्रवास अनुभवण्यासाठी मी उत्सुक आहे”, असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा >> “नैराश्याबद्दल बोलण्यासाठी मला कंपनीने पैसे…”, दीपिका पदुकाणने मानसिक आजाराबाबत केला खुलासा

अंकिताने चित्रपटाची टीम आणि निर्मात्यांचेही आभार मानले आहेत. “हे तुमच्याशिवाय शक्य झालं नसतं. तुम्ही कायमच माझ्या पाठीशी उभे राहिला आहात. थॅंक यू प्रोड्युसर साहेब. मला ही संधी दिल्याबद्दल ‘आनंद पंडित मोशन पिक्चर’चे आभार . एक उत्तम अभिनेता आणि आता दिग्दर्शकाचीही भूमिका पार पाडणाऱ्या रणदीप हुड्डालाही धन्यवाद”, असंही तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा >> “तैमूरला सांभाळणाऱ्या नॅनीला किती पगार मिळतो?”, नीतू कपूर म्हणतात “एक कोटी…”

हेही पाहा >> Photos : …अन् अमिताभ बच्चन यांच्या नावामुळे इराणमध्ये सुधा मूर्तींना मिळाली होती मोफत सेवा; स्वत:च सांगितला किस्सा

क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनपटलावर ‘स्वांतत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तो दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल ठेवत आहे. आता अंकिता लोखंडेचीही चित्रपटात वर्णी लागली असल्यामुळे चाहतेही उत्सुक आहेत. रणदीप हुड्डासह अंकिता या चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे अंकिताला लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने सुशांत सिंह राजपूतसह मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘बाघी ३’ आणि कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’ चित्रपटातही अंकिता दिसली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress ankita lokhande jain to play lead role in randeep hooda swatantra veer savarkar movie kak