२०२३मध्ये नवाजुद्दीन सिद्दिकीचा ‘टिकू वेड्स शेरू’ नावाचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकी २८ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीबरोबर रोमान्स करताना पाहायला मिळाला होता. याची चर्चा खूप रंगली होती. या चित्रपटातील दोघांचा किसिंग सीनवरून खूप ट्रोल केलं होतं. ‘टिकू वेड्स शेरू’मध्ये नवाजुद्दीनबरोबर झळकलेली ही अभिनेत्री आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच एका मुलाखतीमधून तिने आजवरच्या करिअरमध्ये घडलेले वाईट प्रसंग सांगितले.
‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दिकीसह रोमान्स करणारी ही अभिनेत्री म्हणजे अवनीत कौर ( Avneet Kaur ). खूप लहान वयात अवनीतने मनोरंजनविश्वात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. अलीकडचे अवनीतचं नाव भारतीय क्रिकेटर शुभमन गिलबरोबर जोडलं गेलं होतं. त्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. त्यानंतर अवनीतने ‘हाउटरफ्लाइ’ला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्याबरोबर घडलेले वाईट प्रसंग सांगितले. अवनीत कौरने सांगितलं, जेव्हा ती आठ वर्षांची होती, तेव्हा तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. डान्स रिहर्सलदरम्यान एक व्यक्ती सतत तिला इकडे-तिकडे स्पर्श करत होता. तेव्हा तिने याबाबत तिच्या आईला सांगितलं. त्यावेळी तिच्या आईने वाईट स्पर्श आणि चांगला स्पर्श याबाबत सांगितलं. तेव्हापासून अवनीतने या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या होत्या.
“मी खूप घाबरले होते”
त्यानंतर अवनीतबरोबर ( Avneet Kaur ) वयाच्या ११व्या वर्षी एका दिग्दर्शकाने गैरवर्तन केलं. ती म्हणाली की, जेव्हा मी स्ट्रगल करत होते. तेव्हा माझ्याबरोबर एक प्रसंग घडला होता आणि त्यामुळे मी खूप घाबरले होते. यावेळेस मी माझ्या करिअरला सुरुवात करत होते. तेव्हाच एका दिग्दर्शकाने मला भली मोठी मोनोलॉगची स्क्रिप्ट दिली होती. मी खूप घाबरले होते. कारण तेव्हा मी फक्त ११, १२ वर्षांची होती आणि दोन-तीन वेळा चुकले होते. त्यांनी माझा माइक सुरू केला होता. मी खूप अडखळत बोलत होती. हे पाहून दिग्दर्शक भडकला. तो मला म्हणाला की, मी कोणतही काम करण्यासाठी सक्षम नाही आणि इंडस्ट्रीत मी कधीही यशस्वी होणार नाही. त्यानंतर दिग्दर्शकाने मला शिवीगाळ करायला सुरुवात केली.
पुढे अवनीत कौर ( Avneet Kaur ) म्हणाली, “तेव्हा आई-वडिलांना सेटवर येण्याची परवानगी दिली नव्हती आणि यामुळेच हा प्रसंग माझ्याबरोबर घडला. जेव्हा मी हा प्रसंग आई-वडिलांना सांगितला. त्यावेळेस मी खूप खचले होते. पण, त्या दिग्दर्शकाने असं गैरवर्तन अजून एका अभिनेत्रीबरोबर केलं होतं, हे मला पुढे जाऊन कळालं.”