अभिनेत्री भूमी पेडणेकर नेहमीच तिच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या कामाप्रमाणे ती तिच्या वक्तव्यांमुळे ही सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेत असते. ती तिचे विचार प्रत्येकवेळी स्पष्टपणे मांडताना दिसते. तर याच बरोबर तिच्या फॅशनकडेही सर्वांचं लक्ष असतं. आतापर्यंत बऱ्याचदा तिला तिच्या तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे ट्रोल केलं गेलं आहे. तर आता नुकतीच एका कार्यक्रमाला गेली ती गेली होती. यावेळी तिने केलेल्या विचित्र स्टाईलमुळे ती ट्रोल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भूमीने नुकतीच पिंकविलाने आयोजित केलेल्या एका पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये तिच्या कपड्यांमुळे नेटकरांचे लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं. या वेळेचा तिचा एक व्हिडीओ सध्या खूपच व्हायरल होत आहे. या पार्टीत तिने काळ्या रंगाचा एक ड्रेस परिधान केला होता. पण तिचा तो ड्रेस नेटकऱ्यांना अजिबात आवडला नाही.

आणखी वाचा : “त्यावेळी माझ्या शरीरावर खूपच कमी कपडे होते आणि…”; भूमी पेडणेकरने सांगितला ‘तो’ सेक्स सीन शूट करतानाचा अनुभव

या पार्टीला भूमीने परिधान केलेला काळ्या ड्रेसवर काळ्या रंगाची सिल्कची झालं लावण्यात आली होती. तर या ड्रेस बरोबर तिने काळ्या रंगाचे हाय हिल्स घातले होते. पण हा तिचा लुक पाहून नेटकऱ्यांनी तिची तुलना पालीशी आणि कोंबडीशी केली. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

हेही वाचा : Video: भूमी पेडणेकर होणार विवाहबद्ध?, सिद्धार्थ-कियाराच्या रिसेप्शनवेळी अभिनेत्रीने सर्वांसमोर ‘त्याला’ केलं किस, व्हिडीओ चर्चेत

एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “हिचा फॅशन सेन्स दिवसेंदिवस खराब होत चालला आहे.” तर दुसरा म्हणाला, “ही तर दोन शेपटींची पाल वाटत आहे.” आणखी एकाने लिहिलं, “स्टाईलच्या नावाखाली ही लोकं काय काय करतात! भूमीला ही स्टाईल अजिबात सूट होत नाहीये.” तर आणखी एक जण म्हणाला, “ही तर कोंबडी दिसत आहे.” आता तिचा हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress bhumi pednekar gets troll for wearing weird dress rnv