आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनंतर आता बॉलिवूडमधील आणखी एक कपल लवकरच आई-बाबा होणार आहेत. अभिनेत्री बिपाशा बासू व अभिनेता करण सिंह ग्रोवर यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. बिपाशा-करणने काही महिन्यांपूर्वीच ही आनंदाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली. सध्या दोघंही खूप आनंदात आहेत. मध्यंतरी बिपाशाने करणबरोबर रोमँटिक प्रेग्नेंसी फोटोशूट केलं. आता पुन्हा एकदा तिने केलेलं प्रेग्नेंसी फोटोशूट चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा – “तुझी नेहमीच आठवण येईल” शरद केळकरच्या ‘त्या’ पोस्टनंतर सेलिब्रिटींनीही वाहिली श्रद्धांजली, नेमकं काय घडलं?

premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
young woman abandoned her newborn near Vanzra Layout Nagpur
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
shraddha aarya new born baby photo
प्रसिद्ध अभिनेत्री लग्नानंतर ३ वर्षांनी झाली जुळ्या मुलांची आई, पहिल्यांदाच एका बाळाबरोबरचा फोटो केला शेअर
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

बिपाशा आपलं गरोदरपण एण्जॉय करताना दिसत आहे. गरोदरपणा तिने खास फोटोशूट करत तोच फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. इतकंच नव्हे तर तिचा या फोटोमधील अगदी बोल्ड लूक पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.

बिपाशाने सोनेरी रंगाचा गाऊन परिधान करत हे फोटोशूट केलं आहे. यामध्ये तिचं बेबी बंप दिसत आहे. तसेच प्रेग्नेंसीमध्येही ती किती फिट आहे हे दिसून येतं. शिवाय तिच्या बोल्ड लूकने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आणखी वाचा – ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये मुलाबरोबरच महेश मांजरेकरांनी लेकीलाही दिली काम करण्याची संधी, लूक समोर

बिपाशाच्या या फोटोचं अनेक सेलिब्रिटी मंडळींनी कमेंट करत कौतुक केलं आहे. तर नेटकऱ्यांनीही प्रेग्नेंसीमध्ये इतकं बोल्ड फोटोशूट केल्यानंतर तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. बिपाशाला या फोटोला काही तासांमध्येच लाखो लाइक मिळाले आहेत.

Story img Loader