Celina Jaitley Post: पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार झाला. बलात्कार करून नंतर तिचा खून करण्यात आला. ही घटना उघडकीस आल्यानंतर देशभरातील लोक संताप व्यक्त करत आहेत. महिला डॉक्टरला न्याय मिळावा अशी मागणी सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटीही करत आहेत. अशातच बॉलीवूड अभिनेत्री सेलिना जेटलीने एक पोस्ट केली आहे. यात तिने तिला बालपणी आलेले वाईट अनुभव सांगितले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेलिना जेटलीने इन्स्टाग्रामवर तिचा लहानपणीचा फोटो शेअर करून मोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिने अनेक खुलासे केले आहेत. तिला आजवर अनेक वाईट गोष्टींचा सामना करावा लागला, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय. सेलिनाने लिहिलं, “पीडित व्यक्तीच नेहमी दोषी असते. माझा हा फोटो सहावीतला आहे. त्यावेळी जवळच्या विद्यापीठातील मुलं माझ्या शाळेबाहेर थांबायची. ते रोज माझ्या रिक्षाचा पाठलाग करायचे. मला काहीच माहीत नाही असं नाटक मी करत होते. पण काही दिवसांनी ते माझ्यावर भर रस्त्यात दगड फेकू लागले. तिथे उभं असलेलं कोणीही यावर काहीच बोललं नाही.”

“बसने प्रवास करताना मागून एक हात शरीराभोवती आला अन् मी…”, सई ताम्हणकरने सांगितला धक्कादायक प्रसंग

मला वाटायचं माझीच चूक आहे – सेलिना जेटली

पुढे तिने लिहिलं, “या घटनेबद्दल माझ्या शिक्षिकेद्वारे मला सांगण्यात आलं की मी अतिशय पाश्चिमात्य मुलगी आहे, जी केसांना तेल लावत नाही, दोन वेण्या घालत नाही आणि सैल कपडे घालत नाही. ही माझी चूक होती. या वयात मी अशा गोष्टींचा सामना केला ज्या करायला नको होत्या. एके दिवशी मी सकाळी शाळेत जाण्यासाठी माझ्या रिक्षाची वाट पाहत असताना एका माणसाने मला त्याचे प्रायव्हेट पार्ट दाखवले. काही वर्षे या सगळ्यांसाठी मी स्वतःलाच दोष देत राहिले. माझ्या शिक्षिकेने जे म्हटलं होतं, त्यावरून ही माझीच चूक आहे असं मला वाटायचं.”

अभिनेत्री सेलिना जेटली (फोटो – इन्स्टाग्राम)

प्रिया बापटबरोबर दादरमध्ये एका माणसाने केलं होतं गैरवर्तन, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली, “त्याने माझे स्तन…”

स्कूटरवर अश्लील नोट्स ठेवायचे

सेलिना जेटलीने पुढे लिहिलं, “मला आठवतं की मी ११वीत होते. काही लोकांनी माझ्या स्कूटरची वायर कापली होती. युनिव्हर्सिटीतील मुलं माझ्याशी गैरवर्तन करायचे आणि मला वाईट नावांनी बोलवायचे. माझ्या स्कूटरवर अश्लील नोट्स लिहून ठेवायचे. नंतर तर माझेच मित्र मला घाबरू लागले आणि त्यांनी आमच्या शिक्षकांना याबद्दल सांगितलं. माझ्या शिक्षिकेने मला फोन करून सांगितलं की तू फॉरवर्ड टाईप मुलगी आहेस. तू स्कूटरने ये-जा करतेस, जीन्स घालतेस, केस लहान ठेवतेस त्यामुळे मुलांना वाटतं की तू चारित्र्यहीन आहेस. इथेही माझीच चूक होती. मला आठवतं की एके दिवशी माझ्या स्कूटरची वायर कापल्यामुळे जीव वाचवण्यासाठी मला धावत्या स्कूटरवरून उडी मारावी लागली होती. या घटनेने मला खूप त्रास झाला होता. माझ्या गाडीचे नुकसान झालेच पण मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुखावले होते, तरीही माझीच चूक आहे असं मला म्हटलं जात होतं.”

१७ मिनिटांचा किसिंग सीन अन् ब्लॉकबस्टर सिनेमात काम, एकेकाळी ९०० रुपये महिना कमवायची आमिरची हिरोईन

यात आमचा दोष नाही – सेलिना जेटली

“माझे आजोबा निवृत्त झाले होते, त्यांनी देशासाठी दोन युद्धं लढली होती. तरीही म्हातारपणात ते मला शाळेत न्यायला यायचे. मला अजूनही ती घाणेरडी मुलं आठवतात जी माझा पाठलाग करायची. माझ्या स्कूटीचं नुकसान केलं. माझ्या आजोबांची वाईट पद्धतीने चेष्टा केली. माझ्या आजोबांनी त्या मुलांकडे रागाने कटाक्ष टाकला आणि मान हलवली होती, ते मला अजूनही आठवतं. मी त्यांचा चेहरा वाचू शकले कारण त्यांच्या मनात त्या मुलांविषयी प्रचंड चीड होती. आपल्या हक्कांसाठी आणि संरक्षणासाठी लढण्याची वेळ आता आली आहे. कारण यात आमचा दोष नाही,” असं सेलिनाने या पोस्टमध्ये लिहिलंय.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress celina jaitley recalls horrifying experience of abuse amid kolkata doctor case hrc