बॉलीवूडमध्ये विशिष्ट लोकांच्या संपर्कात किंवा समूहात राहिले तरच काम मिळते असा आरोप यापूर्वी अनेक कलाकारांकडून करण्यात आला आहे. ज्यांची इंडस्ट्रीत कोणाशीही ओळख नाही अशा कलाकारांना प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. याविषयी अनेक बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींनी भाष्य केले आहे. आता सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेल्या डेझी शाहने याबाबत उघडपणे आपले मत मांडले आहे. तसेच बॉलीवूडमध्ये विशिष्ट समूहांत राहिल्याने करिअरवर कसा परिणाम झाला याबाबतही तिने सांगितले आहे.
हेही वाचा : “दिग्पालला एका क्षणात…”, स्मिता शेवाळेने सांगितला ‘सुभेदार’बद्दलचा अनुभव; म्हणाली, “माझं खूप मोठं भाग्य…”
डेझी शाहने नुकत्याच ‘हिंदुस्थान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “बॉलीवूडमध्ये विशिष्ट समूह अस्तित्त्वात आहेत. मला सुद्धा अनपेक्षितपणे यातील एका समूहाचा हिस्सा बनवण्यात आले. यामुळे अनेक निर्माते मला म्हणायचे की, आम्ही तुला चित्रपटासाठी ऑफर देणार होतो पण, तू ज्या ग्रुपचा भाग आहेस तेवढे बजेट आम्हाला परवडणार नाही. निर्मात्यांचे बोलणे ऐकून मला अनेकदा धक्का बसायचा. चित्रपटाची कथा चांगली असेल, तर मी मानधनाचा विचार न करता काम केले असते. समूहाचा भाग असल्याने माझ्या करिअरवर मोठा परिणाम झाला.”
हेही वाचा : “…म्हणून माझे दोन वाढदिवस आहेत”, पंकज त्रिपाठींनी सांगितला किस्सा; म्हणाले, “माझ्या भावाने…”
डेझी शाहने पुढे म्हणाली, “काम नसल्याने कालांतराने मला मानसिक तणाव येऊ लागला आणि घराबाहेर पडणे मी बंद केले. मला कोणाला भेटण्याची इच्छा नव्हती, घराबाहेर पडायचे नव्हते. माझ्या करिअरबाबत मी अजिबात आनंदी किंवा समाधानी सुद्धा नाही. कारण, बॉलीवूडमधील ग्रुप्समुळे माझे करिअर अजूनही सुरु झालेले नाही.”
हेही वाचा : कॉलेजच्या आठवणींना उजाळा देत ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने शेअर केले जुने फोटो, तुम्ही ओळखलंत का?
“सध्या मी फक्त सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करत आहेत. त्या वाईट टप्प्यातून पूर्णपणे मी बाहेर आले आहे. माझ्या दोन चित्रपटांनी आतापर्यंत १०० कोटींचा टप्पा गाठला आहे. मला इंडस्ट्रीतून खूप काही मिळाले असून, जे मिळत नाही त्याकडे आता मी दुर्लक्ष करणार आहे.” असे डेझीने सांगितले. दरम्यान, डेझी शाहने सलमान खानबरोबर ‘जय हो’मध्ये काम केले आहे. अलीकडेच ती ‘खतरों के खिलाडी १३’ मध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे.