बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्या ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट ३१ मे २०१३ ला प्रदर्शित झाला. यानिमित्ताने या चित्रपटातील कलाकारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. नुकतंच दीपिका पदुकोणने रणबीर कपूरबरोबरचे काही खास फोटो शेअर केला आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे
दीपिका पदुकोण ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. यात तिने रणबीर कपूरबरोबरचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ‘ये जवानी है दिवानी’ चित्रपटाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
आणखी वाचा : ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…
यावेळी करण जोहर, अयान मुखर्जी आणि मनीष मल्होत्रा यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण टीमही उपस्थित होती. त्यांच्या या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दीपिकाने हे फोटो शेअर करत चित्रपटातील एक डायलॉग कॅप्शन म्हणून दिला आहे. “यादें मिठाई के डिब्बे की तरह होती है; एक बार खुला तो सिर्फ एक टुकड़ा नहीं खा पाओगे-नैना तलवार” असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
दीपिका पदुकोणने शेअर केलेल्या एका फोटोत ती रणबीरच्या खांद्यावर हात टाकून उभी असल्याचे दिसत आहे. यावेळी ते दोघेही फारच खळखळून हसत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान ये जवानी है दिवानी या चित्रपटाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. करण जोहर निर्मित हा चित्रपट अयान मुखर्जीने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, कल्की कोचलिन आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट त्यांच्या मैत्री आणि नातेसंबंधांवर आधारित होता. या चित्रपटातील गाण्यांना विशेष पसंती मिळाली होती.