‘आरआरआर’च्या यशानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘एसएसएमबी२९’ असं चित्रपटाचं नाव असून यात दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू प्रमुख भूमिकेत असणार आहे. राजामौलींच्या या चित्रपटात बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीची वर्णी लागल्याची माहिती समोर आली आहे.

‘पिंकविला’ने दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री दीपिका पदुकोण राजामौलींच्या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारताना दिसण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या टीमकडून अद्याप दीपिकाला याबद्दल विचारण्यात आलेले नाही. पण या चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी तिच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे महेश बाबूसह दीपिका चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच महेश बाबू आणि दीपिका मोठ्या पडद्यावर एकत्र दिसतील. दीपिका आणि महेश बाबू चित्रपटात रोमान्स करताना दिसणार असल्याचंदेखील बोललं जात आहे.

हेही वाचा >> आलिया भट्ट गिरगावमधील ‘या’ रुग्णालयात देणार बाळाला जन्म

हेही पाहा >> Photos : आलिया भट्टने पहिल्यांदाच केलं मॅटर्निटी फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं पाऊट

‘एसएसएमबी२९’ ची एका सत्य कथेवर आधारित असल्याचं चित्रपटाचे लेखक के.व्ही.विजयेंद्र प्रसाद यांनी सांगितलं आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. “या चित्रपटाच्या निमित्ताने राजामौलीबरोबर काम करण्याची माझी इच्छा पूर्ण होत आहे. आम्ही खूप काळापासून एकत्र काम करण्यासाठी आतुर होतो”,  असं मत महेश बाबूने व्यक्त केलं आहे.

हेही वाचा >> राजकुमार राव लवकरच होणार बाबा? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

महेश बाबू त्याच्या आगामी ‘त्रिविक्रम श्रीनिवास’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री पूजा हेगडे नायिकेची भूमिका साकारत आहे.

Story img Loader