नवीन प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांबरोबरच प्रेक्षक जुने चित्रपटही पाहत असतात. मात्र, ज्या कलाकारांनी चित्रपटांत काम केले आहे, ते त्यांचे जुने चित्रपट पाहतात का? आता अभिनेत्री दिया मिर्झाने यावर वक्तव्य केले आहे.

काय म्हणाली अभिनेत्री?

अभिनेत्री दिया मिर्झाने नुकतीच ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत करिअरच्या सुरुवातीच्या कामाकडे तू कसं पाहतेस, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, “मी फार लवकर काम करायला सुरुवात केली होती. मी अभिनयाचे कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नव्हते. त्यामुळे अभिनयाचे धडे मी काम करता करताच घेतले. त्यावेळी मी स्वत:चा आवाज शोधण्यासाठी धडपडत होते. मी कोण आहे, हे मला स्पष्ट नव्हते.”

Namrata sambherao
“खूपच अभिमान वाटतो”, अभिनेत्री नम्रता संभेरावने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ सहकलाकाराचे केले कौतुक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Women World, Feminist Thought ,
स्त्री ‘वि’श्व : लोकल भी, ग्लोबल भी!
Marathi actress tejashri Pradhan talk about her future life partner
अभिनेत्री तेजश्री प्रधानला ‘असा’ हवाय जोडीदार, म्हणाली, “फक्त नात्यात…”
Deepti Naval recalls meeting Raj Kapoor
“राज कपूर यांच्या अंत्यसंस्काराला गेलेली मी एकमेव महिला…”, दिग्गज बॉलीवूड अभिनेत्रीचं वक्तव्य
sharmila tagore on actors fees
अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी स्टार्सच्या मानधनाबाबत व्यक्त केली चिंता; म्हणाल्या, “ते अभिनयापासून…”
Ashwini Mahangade
“तरीही हिमतीने रणांगणावर…”, अभिनेत्री अश्विनी महांगडे फोटो शेअर करीत काय म्हणाली?
Kavita Medhekar
“चांगल्या घरातील मुली नाटकांत…”, कविता मेढेकर यांनी अभिनयात काम करण्याची परवानगी मागितल्यावर वडिलांची ‘अशी’ होती प्रतिक्रिया; म्हणाल्या…

पुढे बोलताना अभिनेत्रीने सांगितले, “मी ज्यावेळी चित्रपट व्यवसायात आले होते, त्यावेळी आधी एखाद्या सीनची तयारी करायची किंवा रिहर्सल करायची अशी काही पद्धत नव्हती. तो सीन शूट व्हायच्या अगदी काही वेळ आधी त्या सीनची स्क्रिप्ट आमच्याकडे यायची. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीच्या काळातील स्वत:चे चित्रपट पाहताना लाज वाटते. त्याबरोबरच स्त्रियांकडे बुद्धिमत्ता आहे. त्या हुशार आहेत, असे समजले जायचे नाही. त्या स्वत: विचार करू शकतात, अशी वागणूक त्यांना दिली जायची नाही.

“मी एका चित्रपटाला नाही म्हटले होते. त्यावेळी मला असे विचारण्यात आले की, तू या सिनेमाला नाही कसे काय म्हणू शकतेस? एक सुपरस्टार या चित्रपटाचा नायक आहे आणि यामध्ये सहा गाणी आहेत.”

दिया मिर्झाने गेल्या दशकात करिअरच्या सुरुवातीला साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. राजकुमार हिरानीचा ‘संजू’, अनुभव सिन्हाचा ‘थप्पड’, तापसी पन्नूच्या प्रॉडक्शन हाऊसचा ‘धक धक’ या चित्रपटांत ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे. काफिर या वेब सीरिजमधील तिच्या भूमिकेची चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले होते.

हेही वाचा: मुहूर्त ठरला! नवरात्रोत्सवात सुरू होणार ‘स्टार प्रवाह’ची नवीन मालिका ‘उदे गं अंबे’; कोणती जुनी मालिका घेणार निरोप?

दिया मिर्झाने म्हटले, “जर कोणी मला माझ्या विशीमध्ये सांगितले असते की, तू तुझ्या चाळिशीमध्ये जास्त चांगल्या भूमिका करशील, तर मी कधीच विश्वास ठेवला नसता. सध्या मी एक उत्तम ठिकाणी आहे, असे मला वाटते. कारण- एखादी भूमिका मला आवडली नाही; जी माझ्यासाठी नसेल, त्या भूमिकेला नाही म्हणण्याचा मला आता विशेषाधिकार आहे. मी अजूनही असमाधानी आहे. माझ्यात एका कलाकाराची भूक आहे. मला आशा आहे की, ती कधीच शमणार नाही.”

दरम्यान, दिया मिर्झा नुकतीच अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘आय सी ८१४ : द कंदाहार हायजॅक’ (IC 814 : The Kandahar Hijack) मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली आहे. या वेब सीरिजमध्ये पंकज कपूर, नसिरुद्दीन शाह, विजय वर्मा, पत्रलेखा हे कलाकारदेखील आहेत. मात्र, ही वेब सीरिज रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी यातील दहशतवाद्यांची नावे बदलली असल्याचे म्हणत यावर आक्षेप घेतला होता.

Story img Loader