अभिनेत्री दिया मिर्झा ही तिच्या कामापेक्षा आहे तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. पहिल्या लग्नानंतर तिने वर्षभरातच घटस्फोट घेतला. तर त्यानंतर २०२१ साली तिने दुसऱ्यांदा संसार थाटला. आज तिच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस आहे. यानिमित्त तिने तिच्या लग्नाची एक खास झलक चाहत्यांशी शेअर केली आहे.

दिया मिर्झा व वैभव रेखी यांनी १५ फेब्रुवारी २०२१ रोजी लग्न गाठ बांधली. तिच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली. त्या दोघांनी कुटुंबीय, त्यांचे जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत अत्यंत खासगी व रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. तर लग्नानंतर दियाने लग्नाचे फोटोही शेअर केले होते. आता त्यांच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाला तिने या लग्नाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे त्याचं कारण म्हणजे या लग्नात तिने मराठीतून शपथ घेतली होती.

lakhat ek amcha dada fame nitish chavan dance with Mahesh Jadhav and swapnil kinase
Video: प्रेमिका ने प्यार से…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील सूर्यादादाचा काजू, पुड्याबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Girl takes off her t-shirt while dancing in university in viral video
दिल डूबा दिल डूबा गाण्यावर तरुणीचा अश्लील डान्स; स्टेजवरच टी-शर्ट काढलं अन्…VIDEO पाहून नेटकरी भडकले
Lakhat Ek Aamcha dada
Video: तेजूच्या लग्नाची सुपारी फुटली; डॅडी म्हणाले, “खरे नवरदेव…”, पाहा प्रोमो
tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
sarpanch viral video | Wife caught husband with girlfriend
सरपंचाचं लफडं बायकोनं पकडलं; नवऱ्याबरोबर कारमधून फिरणाऱ्या गर्लफ्रेंडची केली अशी अवस्था की…; VIDEO झाला व्हायरल

आणखी वाचा : पुण्याला पोहोचताच श्रद्धा कपूरने घेतला अस्सल पुणेरी मिसळ व वडापावचा आस्वाद, म्हणाली, “आयुष्यभरासाठीचा…”

लग्नाच्या व्हिडीओमध्ये कमी लोकांमध्ये पण अत्यंत उत्साहात त्यांचं लग्न झालेलं दिसत आहे. यात ते दोघे एकमेकांना अंगठी घालताना दिसत आहेत, वैभव दियाच्या भांगेत सिंदूर भरताना आणि तिला मंगळसूत्र घालताना दिसत आहे, तर ते दोघं एकत्र मॅरेज सर्टिफिकेटवर सही करताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या शेवटी दोघांनीही आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली. वैभवने ही शपथ इंग्रजीमध्ये घेतली तर दियाने मराठीतून. अडखळत अडखळत तिने मराठीत लिहिलेली शपथ वाचली आणि वैभवचा पती म्हणून स्वीकार केला.

हेही वाचा : दिया मिर्झाने मुलाचा पहिला फोटो केला शेअर, कमेंट करत प्रियांका म्हणाली…

आता तिचा हा व्हिडिओ खूप चर्चेत आला आहे. आता या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांनी दियाच्या मराठी बोलण्याचंही कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ आता सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.