‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेत निहारिका तलवार कपूरचे पात्र साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री इवा ग्रोव्हरने नुकताच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. इवाने पळून जाऊन आमिर खानचा सावत्र भाऊ हैदर अली खानशी आंतरधर्मीय लग्न केलं होतं. तिने लग्नाचे वाईट अनुभव, मुलीचा जन्म याबाबत भाष्य केलं आहे. इवाने केलेल्या चुकांची कबुली दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरातून पळून जाऊन आंतरधर्मीय लग्न केलं होतं, असं इवाने सांगितलं. “माझ्याकडे जगातील सर्व सुख-सुविधा होत्या, मी चांगलं काम करत होते, पण मला फक्त तेवढंच नको होतं. मला घर हवं होतं, प्रेमळ नवरा आणि प्रेमळ मुलं हवी होती. मला गृहिणी व्हायचं होतं. पण माझं हे स्वप्न पूर्ण होण्याऐवजी मला बाकी सगळ्या गोष्टी मिळाल्या. मी प्रेमविवाह केला होता. ओळख झाल्यावर अवघ्या १८ दिवसांत आम्ही पळून जाऊन लग्न केलं. तो वेगळ्या धर्माचा होता, त्यामुळे आम्ही लग्न करू नये असं माझ्या आईचं मत होतं, तिचा विरोध असल्याने आम्ही पळून गेलो. पण लग्न केल्यावर चौथ्या दिवशी मला जाणीव झाली की लग्न जर असं असेल तर विवाहसंस्था का अस्तित्वात आहे?”

निक्कीशी जवळीक असलेल्या अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडने घेतला मोठा निर्णय, नेटकरी म्हणाले, “तू कोणत्या त्रासातून…”

लग्नाचा अनुभव खूप वाईट – इवा

पॉडकास्ट कॉफी अनफिल्टर्डला दिलेल्या मुलाखतीत इवा म्हणाली, “हे लग्न पाच वर्षे टिकलं आणि या काळात आम्ही फक्त अडचणी पाहिल्या. माझा संसार मोडू नये म्हणून मी खूप प्रयत्न केले. माझं लग्न वाचवण्यासाठी मी बाळाला जन्म दिला, पण नंतरही काहीच बदललं नाही. मला वाटतं की तो लग्नाची जबाबदारी घेण्याइतका परिपक्व नव्हता. तो आमिर खानचा सावत्र भाऊ होता. मी त्याला डेट करताना तो खूप वेगळा होता आणि तो लग्नानंतर फार बदलला. माझा लग्नाचा अनुभव खूपच वाईट होता.”

Video: “…तर माझं नाव बदल”, संग्राम चौगुलेच्या ‘त्या’ कृतीमुळे निक्कीचा संताप अनावर; पाहा नेमकं काय घडलं

मुलगी दुरावली – इवा

इवाने तिची मुलगी निष्ठा खानबद्दलही सांगितलं. निष्ठा अवघी तीन वर्षांची असताना तिला इवापासून दूर करण्यात आलं होतं. “घटस्फोट झाला, माझी मुलगी तीन वर्षांची होईपर्यंत माझ्याबरोबर राहिली. एके दिवशी मी शूटिंगवरून परत आले आणि आईला विचारलं की माझी मुलगी कुठे आहे आणि आई म्हणाली की तिने निष्ठाला तिच्या वडिलांना दिलंय. माझी मुलगी माझ्याजवळून गेली आणि तिला मी १० वर्षे भेटू शकले नव्हते. ती आता नातेवाईकांकडे राहते, मी तिला अधूनमधून भेटते आणि तिच्याबरोबर राहते. मी माझ्या सासरच्या लोकांना आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळेस मी नैराश्यातून जात होते, माझ्या डोक्यात खूप राग होता आणि अनुत्तरीत प्रश्न होते. त्या काळात माझ्याशी बोलायला कुणीच नव्हतं.”

इवाने सलमान खानचा चित्रपट ‘रेडी’मध्ये काम केलं होतं. ती ‘करिश्मा का करिश्मा’, ‘कोरा कागज’, ‘बिदाई’ या मालिकांमध्ये झळकली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress eva grover eloped after mother opposed her interfaith wedding with aamir khan stepbrother hyder ali khan divorced hrc