‘बिग बॉस ७’ची विजेती आणि बॉलीवूड अभिनेत्री गौहर खान ही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. बुधवारी १० मे रोजी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. गौहर खान ही सध्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. पण त्याबरोबरच ती तिच्या फिटनेसकडेही लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. गौहरने १० दिवसांत १० किलो वजन कमी केले आहे.

हेही वाचा- “अन्न अल्लाह देतो तू नाही”; चिडलेल्या सरोज खान यांनी सलमान खानला चांगलचं खडसावलेलं, म्हणालेल्या….

Bollywood Artists News, Marathi news
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानच नाही तर सलमान खान, रवीना टंडन यांच्यासह ‘या’ कलाकारांवरही झाला होता हल्ला
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi emotional post
“भाईजान आम्हाला तुझा…”, सैफ अली खानसाठी बहिणीची भावुक पोस्ट, बालपणीचा फोटो शेअर करत म्हणाली…
bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
ibrahim ali khan took saif ali khan hospital in rickshaw
चोर मदतनीसच्या खोलीत शिरला, आरडाओरडा ऐकून सैफ आला अन्…; इब्राहिमने बाबाला रिक्षातून नेलं रुग्णालयात
saif ali khan treatment at lilavati hospital who is dr nitin dange
सैफ अली खान ‘आऊट ऑफ डेंजर’! अभिनेत्याची शस्त्रक्रिया करणारे मराठमोळे डॉ. नितीन डांगे आहेत तरी कोण? मध्यरात्री केली धावपळ
Saif Ali Khan Attack
Saif Ali Khan : “फक्त सैफ अली खान याचं आडनाव खान आहे म्हणून…”, हल्ल्याबाबत गंभीर शंका घेणार्‍या आव्हाडांना गृहराज्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
Saif Ali Khan Attacked With Knife At Home
हल्ल्यानंतर सैफच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचली लेक सारा अली खान, सोबतीला होता भाऊ इब्राहिम, पाहा व्हिडीओ

प्रसूतीनंतर १८ दिवसांत गौहरचे वजन खूप कमी झाले आहे. गौहरने तिच्या ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो शेअर केला आहे. फोटोत, अभिनेत्रीने पांढर्‍या स्लीव्हलेस टी-शर्टसह काळी पँट घातली आहे. फोटोत गौहर आपले कमी झालेले पोट दाखवताना दिसत आहे. “नो फिल्टर १८ डेज पोस्टपार्टम.” अशी कॅप्शनही गौहरने स्टोरीला दिली आहे.

याअगोदरही गौहरने आपल्या कमी केलेल्या वजनाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. गौहरने १० दिवसांमध्ये १० किलो वजन कमी केले हे ऐकूनच सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. एवढ्या कमी वेळात तिने एवढं वजन कमी कसं केलं, असा प्रश्न सगळ्यांना पडला होता.

हेही वाचा- “… त्यापेक्षा हिंदू हो,” महाकाल मंदिरात गेल्यामुळे सारा अली खान ट्रोल

गौहर आहारात काय घेते?

गौहर खान सकाळी नाश्यात थंड दुधात सुका मेवा आणि फळे मिसळून खाते. यामुळे तिला दिवसभर तंदुरुस्त राहण्यास मदत होते. दुपारच्या जेवणात गौहर भाजीसोबत साधे जेवण घेते. प्रोटीनसाठी ती चिकन आणि सॅलड खाते. गौहरच्या आहारात प्रथिने जास्त असतात पण ती कार्ब्स कमी करत नाही. गौहरला संध्याकाळी पोहे आणि पॅनकेक खायला आवडतात, नाही तर ती कमी तेलकट पदार्थ खाते. गौहर रात्री ८ वाजण्यापूर्वी आपलं जेवण करून घेते. रात्रीच्या जेवणात ती पोळ्या आणि ग्लूटेनयुक्त पदार्थ खाण्याचे टाळते.

दरम्यान, गौहर खान आणि तिचा पती जैद दरबार याने नुकतंच पहिल्या बाळाचं स्वागत केलं. गौहर खानने ३९ व्या वर्षी बाळाला जन्म दिला. “आम्हाला मुलगा झाला आहे. सलाम ऊ अलैकुम, या सुंदर जगात तुझे स्वागत, अशी पोस्ट त्यांनी केली होती.

Story img Loader