शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाची त्याचे चाहते खूप आतुरतेने या चित्रपटाची वाट बघत होते. हा बहुप्रतिक्षित चित्रपट आज प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये शाहरुख खानबरोबर मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. तर आता गिरीजाने शाहरुखबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता आणि शाहरुख खान खऱ्या आयुष्यात कसा आहे हे सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गिरीजाने सौमित्र पोटेच्या यूट्यूब चॅनलवरील ‘मित्र म्हणे’ या कार्यक्रमात नुकतीच एक मुलाखत दिली. यावेळी ती तिच्या विविध कामांबद्दल भरभरून बोलली. तर यावेळी तिने शाहरुखबरोबर काम करण्याचा तिचा अनुभवही शेअर केला.

आणखी वाचा : Video: “मला खरंच…” भर कार्यक्रमात शाहरुख खानने केलं मराठमोळ्या गिरीजा ओकचं कौतुक, म्हणाला…

ती म्हणाली, “मला शाहरुख खानबरोबर काम करताना खूप मजा आली. मी त्याला या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा भेटले. आपण सगळे त्याच्याबद्दल जे काही ऐकून आहोत की तो खूप जेंटलमन आहे, तो खूप नम्र आहे, तो खूप चांगला माणूस आहे हे सगळं खरं आहे. मी आधीपासूनच त्याची प्रचंड मोठी फॅन आहे. मला शाहरुखला भेटण्याच्या आधी असं वाटलं होतं की, आपण जे त्याच्याबद्दल ऐकून आहोत तो तसा नसला तर? पण तसं काहीही झालं नाही.”

हेही वाचा : “…आणि हे मी यापुढे कधीच करणार नाही,” शाहरुख खानचं ‘जवान’ चित्रपटाबद्दल मोठं वक्तव्य

पुढे ती म्हणाली, “सेटवर येताना तो पूर्ण तयारी करून येतो. तो त्याचे संवाद विसरला असं कधीच होत नाही. संवाद पाठ असणं ही प्रार्थमिक गोष्ट झाली. पण त्या पलीकडे जाऊन त्याला त्याची ॲक्शन कंटिन्यूइटी, त्याने केलेल्या सगळ्या गोष्टी चोख लक्षात असतात. काही कारणाने रिटेक झाले किंवा दिग्दर्शकाने काही बदल सुचवले तर ते शाहरुख खानला सगळं लक्षात असतं. पण जर कधी त्याच्यामुळे रिटेक घ्यावा लागला तर तो त्याच्या सहकलाकारांना मनापासून सॉरी म्हणतो. हे मी अनुभवलं आहे. त्याच्या सॉरी म्हणण्यात कुठेही खोटेपणा जाणवत नाही. मला त्या माणसाची ग्रेस खूप आवडते.” तर आता गिरीजाचं हे बोलणं चर्चेत आलं आहे. या चित्रपटातील तिच्या कामाचंही सर्वजण सोशल मीडियावर कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress girija oak revealed shahrukh khan nature and shared experience of working with him rnv