काही महिन्यांपूर्वी दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपट ‘द व्हॅक्सिन वॉर’ची घोषणा केली, तेव्हापासून देशभरात हा चित्रपट चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटाबद्दल सर्वांच्याच मनात प्रचंड उत्सुकता आहे. या महिन्याच्या अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण आता त्या आधीच अभिनेत्री गिरीजा ओकने या चित्रपटाची कथा काय असेल, याचा खुलासा केला आहे.
‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटातून जगातली पहिली कोरोना प्रतिबंधक व्हॅक्सिन तयार करण्यामागची गोष्ट मोठ्या पडद्यावर उलघडली जाणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रदर्शित झालं. या चित्रपटामध्ये नाना पाटेकर, अनुपम खेर, पल्लवी जोशी, गिरीजा ओक असे अनेक कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसतील. तर आता गिरीजाने या चित्रपटाचं एक गुपित उघड केलं आहे.
या चित्रपटाची कथा काय असेल हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तर मध्यंतरी आर माधवन याने देखील या चित्रपटाचे भरभरून कौतुक केलं. त्यामुळे या चित्रपटात नक्की काय दाखवण्यात येईल याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. आता गिरीजा ओकने याचं उत्तर दिलं आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर या चित्रपटाचं एक नवीन पोस्टर शेअर केलं. ते शेअर करत तिने लिहिलं, “भारतातील खऱ्या सुपरहिरोजबद्दल हा चित्रपट आहे. या चित्रपटाची गोष्ट अशी आहे जी प्रत्येक पालकाला आपल्या मुलांना दाखवायला आवडेल. ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट जगभरात २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.”
त्यामुळे आता या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात आणखीनच उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या टीझरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तर आता सर्वांचं लक्ष या चित्रपटाचा ट्रेलरकडे लागलं आहे.