अभिनेत्री-खासदार हेमा मालिनी या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने गेली अनेक वर्षं त्या प्रेक्षकांना भुरळ घालत आल्या आहेत. त्यांची लोकप्रियता आजही कायम आहे. एरवी आलिशान गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या हेमा मालिनी यांनी नुकताच ‘मुंबई मेट्रो’ प्रवासाचा आनंद घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेमा मालिनी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांशी संपर्कात असतात. विविध फोटो, व्हिडीओ पोस्ट करीत त्या त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करीत असतात. तर आता त्यांनी त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यात त्या ‘मुंबई मेट्रो’तून प्रवास करताना दिसत आहेत. हेमा मालिनी मेट्रोतून प्रवास करीत आहेत, हे सर्वांसाठीच एक मोठे सरप्राइज होते.

आणखी वाचा : वयाच्या ७४व्या वर्षी हेमा मालिनींनी हवेत तरंगत केला बॅले डान्स, भारावलेली लेक म्हणाली…

हेमा मालिनी यांनी ट्वीट करीत या प्रवासाचा अनुभव सांगितला. त्यांनी या प्रवासादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करीत लिहिले, “आज मला तुमच्याबरोबर एक खास अनुभव शेअर करायचा आहे. मला कारने दहिसरला पोहोचायला दोन तास लागले. तो खूप कंटाळवाणा प्रवास होता. त्यामुळे संध्याकाळी मी परत येताना कारऐवजी मेट्रोने येण्याचा निर्णय घेतला. काय मजेदार अनुभव होता तो! मी अर्ध्या तासात जुहूला पोहोचले.”

हेही वाचा : काम मिळत नव्हते म्हणून वैतागून धर्मेंद्र यांनी घेतलेला ‘हा’ मोठा निर्णय, पण…

हेमा मालिनी यांना मेट्रोमध्ये पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. तर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्याबरोबर मेट्रोत सेल्फीही काढले. इतकेच नाही तर ‘मेट्रो प्रवासा’नंतर त्यांनी रिक्षा प्रवासाचाही आनंद घेतला. डी.एन.नगर ते जुहू असा त्यांनी रिक्षातून प्रवास केला. या प्रवासाचा व्हिडीओ पोस्ट करीत त्यांनी लिहिले आहे, “हा व्हिडीओ मी रिक्षातून शूट केला आहे. मी स्वतः याचा खूप आनंद घेतला!” आता त्यांच्या या सगळ्या पोस्ट्सवर प्रतिक्रिया देत त्यांचे चाहते त्यांच्या साधेपणाचे कौतुक करीत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress hema malini enjoyed metro and auto ride in mumbai rnv