‘गदर २’ हा चित्रपट चित्रपटगृहात काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाचे शो हाउसफुल होत असून सोशल मीडियावर या चित्रपटाचं सर्वजण खूप कौतुक करत आहेत. तर काही महिन्यांपूर्वी शाहरुख खानचा ‘पठाण’ही असाच सुपरहिट ठरला होता. आता हे दोन चित्रपट सुपरहिट होण्यामागचं कारण हेमा मालिनी यांनी सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेमा मालिनी बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री त्यांना बरोबरच त्या उत्कृष्ट प्रेक्षकही आहेत. अनेक चित्रपट त्या आवर्जून चित्रपटगृहात जाऊन बघतात. इतकंच नाही तर त्यावर भाष्यही करतात. नुकताच त्यांनी त्यांना ‘गदर २’ आवडल्याचं सांगितलं होतं. तर आता त्यांनी गदर आणि पठाण सुपरहिट होण्यामागचं कारण सांगितलं आहे.

आणखी वाचा : “पती धर्मेंद्र यांच्याबरोबर राहत नाही कारण…”, हेमा मालिनींचा मोठा खुलासा

‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मोठ्या पडद्यावर पाहिलेले चित्रपट आपल्याला वेगळे दिसतात. जसं आम्ही गेली अनेक वर्ष बघत आलो आहोत. ओटीटी प्लॅटफॉर्म आणि वेब सिरीज टाईमपाससाठी चांगल्या आहेत पण मला माहित नाही ते किती छान आहे. म्हणून ‘गदर २’ आणि ‘पठाण’सारखे चित्रपट मोठ्या पदावर प्रदर्शित झाल्याने सुपरहिट झाले. लोकांना मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहायला आवडतं जे छोट्याशा स्क्रीनवर चित्रपट पाहण्यापेक्षा खूप वेगळं आहे.”

हेही वाचा : वयाच्या ७४व्या वर्षी हेमा मालिनींनी हवेत तरंगत केला बॅले डान्स, भारावलेली लेक म्हणाली…

दरम्यान, शाहरुख खानचा ‘पठाण’ यावर्षी जानेवारीत प्रदर्शित झाला होता आणि ‘गदर २’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. हे दोन्ही चित्रपट जगभरात हिट ठरले आहेत.