बॉलिवूडची ड्रीम गर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी या नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणाऱ्या हेमा यांची लोकप्रियता आजही कायम आहे. आजही त्यांच्या अभिनयाप्रमाणेच त्या त्यांच्या नृत्यातून त्या प्रेक्षकांना भारावून टाकतात. त्यांच्या नृत्याचे लाखो चाहते आहेत. नुकताच त्यांनी बॅले डान्स सादर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईतील एनसीपीएच्या ग्राउंडवर नुकताच एक शानदार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात हेमा मालिनी यांनी त्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मोहित केलं. त्यांनी गंगा नदीवर आधारित एक बॅले डान्स केला. पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान करून त्यांनी हवेत तरंगत एरियल प्रकारे हा बॅले डान्स सादर केला. त्यांचं हे नृत्य पाहून त्यांच्या लेक ईशा देओल हिने त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे.

आणखी वाचा : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट…” नागराज मंजुळे स्पष्टच बोलले

ईशाने या नृत्य सादरीकरणादरम्यानचा त्यांचा एक फोटो पोस्ट करत लिहिलं, “माझ्या आईचा गंगेवर आधारित डान्स मी पाहिला. हे सादरीकरण अत्यंत सुरेख आणि नेत्रदीपक होतं. यातून पर्यावरण संरक्षण आणि नद्यांच्या जीर्णोद्धाराबाबत एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे. तुम्ही याचा पुढील शो नक्की पाहा. लव्ह यू मम्मा…”

हेही वाचा : अभिषेक बच्चनने जावई व्हावे हेमा मालिनी यांची होती इच्छा, पण ईशा देओलने ‘या’ कारणासाठी दिला होता नकार

वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी केलेला हा बॅले डान्स पाहून सर्वच प्रेक्षक भारावून गेले. या दरम्यानचे अनेक फोटो पोस्ट करत नेटकरी हेमा मालिनी यांचा हा डान्स खूप आवडला असल्याचं सांगत त्यांचं कौतुक करत आहेत. या त्यांच्या डान्समुळे हेमा मालिनी सध्या खूप चर्चेत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress hema malini perform ballet dance on ganga river rnv