धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचं नाव बॉलीवूडमधील लोकप्रिय कपलच्या यादीमध्ये सामील आहे. त्यांच्या लग्नाला ४३ वर्षे झाली. हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं तेव्हा धर्मेंद्र यांना पहिल्या पत्नीपासून चार मुलं होती. तरीही हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि ते विवाह बंधनात अडकले. परंतु ते एका घरात राहत नाहीत. आता लग्न झालं असूनही हेमा मालिनी यांनी त्या धर्मेंद्र यांच्याबरोबर का राहत नाहीत हे सांगितलं आहे.
पहिली पत्नी प्रकाश कौर यांच्याबरोबर धर्मेंद्र यांचा घटस्फोटही झाला नव्हता. याच कारणावरुन हेमा मालिनी यांच्या वडिलांना धर्मेंद्र यांच्याबरोबर असलेलं नातं मान्य नव्हतं. तरीही हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. धर्मेंद्र यांच्याशी लग्न केल्यावर हेमा मालिनींनी वेगळं राहून त्यांच्या दोन्ही मुलींचं संगोपन करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा : वयाच्या ७४व्या वर्षी हेमा मालिनींनी हवेत तरंगत केला बॅले डान्स, भारावलेली लेक म्हणाली…
याबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, “अशाप्रकारे जगायला कुणालाच आवडत नाही पण होतं. आपल्या जीवनात कधी कधी अनपेक्षित वळणं येतात आणि आपल्याला त्यांचा स्वीकार करावा लागतो. याचबरोबर आपण त्यांच्याशी जुळवून घेतलं पाहिजे. धर्मेंद्र नेहमी माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी भक्कमपणे उभे असतात. आपल्या पती आणि मुलांबरोबर एक सामान्य परिवार असावा अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पण कधी कधी परिस्थिती आपल्याला वेगळ्याच मार्गावर घेऊन जाते.”
आणखी वाचा : काम मिळत नव्हते म्हणून वैतागून धर्मेंद्र यांनी घेतलेला ‘हा’ मोठा निर्णय, पण…
अशाप्रकारे आयुष्य जगण्यामध्ये हेमा मालिनींना कोणतंही दुःख वाटत नाही किंवा त्या अजिबात नाराजही नाहीत. त्यांचं जे आयुष्य आहे त्याबद्दल त्या समाधानी आहेत असा खुलासाही त्यांनी या मुलाखतीत केला.