Hina Khan : मालिकाविश्वातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री हीना खान सध्या कर्करोगाशी मोठी झुंज देत आहे. अभिनेत्रीला स्तनाचा कर्करोग झाला आहे. कर्करोग होऊनही हीना खचलेली नाही. ती सातत्याने उपचार घेत आहे. तसेच सोशल मीडियावर चाहत्यांना तिच्या प्रकृतीची प्रत्येक अपडेट देत आहे. आतादेखील तिने सोशल मीडियावर रुग्णालयातील काही फोटो पोस्ट केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फोटोमध्ये दिसत आहे की, हीना रुग्णालयातील खोलीबाहेर असलेल्या जागेत चालत आहे. येथे ती कॅमेऱ्याकडे पाठ करून चालली आहे. अभिनेत्रीच्या हातात एक पाऊच बॅग आणि काही गोल आकाराच्या बाटल्या आहेत. त्यावरून ती किती वेदना सहन करत असेल याचा अंदाज येत आहे. हीनाला कर्करोगामुळे केमोथेरपीबरोबर अन्यही काही उपचार घ्यावे लागत आहेत. कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारावर मात करताना तिने याआधीही सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले होते.

हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्रीने हटवलं पतीचं आडनाव, घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच सोडलं मौन; म्हणाली…

आता हीनाने पोस्ट केलेल्या फोटोंना तिने, “उपचारांच्या या ठिकाणावरून उज्ज्वलतेकडे वाटचाल… एका वेळी एक पाऊल. आभार आभार आणि फक्त आभार, प्रार्थना”, अशी कॅप्शन दिली आहे. अभिनेत्रीची अशी परिस्थिती पाहून आता चाहतेसुद्धा भावूक झालेत. अनेक चाहत्यांनी या फोटोवर कमेंट्स केल्यात. काहींनी पाणावलेल्या डोळ्यांचे इमोजी शेअर केले आहेत.

“असंच तुला कोणी शेर खान नाही म्हणत. आमच्या सर्वांची प्रार्थना तुझ्याबरोबर आहे.”, “तू लवकर बरी होशील आणि तुला लवकर बरे व्हावे लागेल. आमच्या सर्वांच्या प्रार्थना तुझ्याबरोबर आहेत.”, “तुला पाहून अनेक व्यक्ती जगणं शिकत आहेत”, अशा अनेकविध कमेंट्स हीनाच्या या पोस्टवर आल्या आहेत.

कर्करोग आहे म्हणून हीना खानने हार मानलेली नाही. या रोगाशी झुंज देत, ती अनेक कार्यक्रमांनाही भेट देत आहे. काही दिवसांपूर्वीच हीनाने मुंबईतील एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. ‘बिग बॉस १८’च्या एका ‘रविवार का वार’मध्ये हीना गेल्या महिन्यात झळकली होती. त्यावेळी सलमान खानने तिचे शेर खान म्हणत स्वागत केले होते.

हिना खानची इन्स्टाग्राम पोस्ट

हेही वाचा : “त्या स्कीटनंतर इतकं हसं झालं”, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील किस्सा; म्हणाली…

इतकेच नाही, तर काही दिवसांपूर्वीच हीनाने एका फॅशन शोमध्ये रँप वॉकसुद्धा केला होता. त्यावेळी तिने नवरीची वेशभूषा केली होती. हीना आजारी असतानाही शांत बसलेली नाही. ती कोणत्या ना कोणत्या कामातून सोशल मीडियावर अॅक्टिव्ह दिसते आहे.