बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री इलियाना डिक्रुझ हिने आज सकाळी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. एक पोस्ट शेअर करत ती गरोदर असल्याची घोषणा तिने केली. ती आई होणार असल्याचं तिने सांगताच सर्वजण अचंबित झाले. ती लग्न करण्याच्या आधीच बाळाला जन्म देणार आहे हे नेटकरी आवाक् होण्याचं मुख्य कारण आहे. तिच्या होणाऱ्या बाळाचे वडील कोण, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

काही दिवसांपूर्वी, इलियाना कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियनला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ‘कॉफी विथ करण सीझन ७’मध्ये करण जोहरने याबद्दल भाष्य केलं होतं. पण इलियानाने आतापर्यंत त्याच्याशी लग्न केलेलं नाही. तर आता इलियानाची पोस्ट पाहून या बाळाचे वडील कोण? असा प्रश्न नेटकरी विचारू लागले आहेत.

premature birth misunderstanding about babies born at 8 months not to survive
स्त्री आरोग्य : आठव्या महिन्यातलं मूल वाचत नाही?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
Priya Berde
प्रिया बेर्डे यांना भविष्यात साकारायचीय ‘ही’ व्यक्तिरेखा, म्हणाल्या, “माझ्या आईने…”
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
shraddha aarya new born baby photo
प्रसिद्ध अभिनेत्री लग्नानंतर ३ वर्षांनी झाली जुळ्या मुलांची आई, पहिल्यांदाच एका बाळाबरोबरचा फोटो केला शेअर
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”

आणखी वाचा : लग्न न करताच इलियाना डिक्रूज होणार आई, गरोदरपणाची घोषणा करत म्हणाली…

इलियानाने आज सकाळी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो पोस्ट केले. पहिल्या फोटोत बाळाचे कपडे दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये ‘ममा’ असं लिहिलेली एक चेन दिसत आहे. हे फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, “कमिंग सून… तुला भेटण्याची मी आणखीन वाट पाहू शकत नाही माय लिटिल डार्लिंग.” ही पोस्ट इलियानाने शेअर करताच नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला तर काहींनी या बाळाच्या वडिलांबाबत प्रश्न उपस्थित केला.

हेही वाचा : “मला रोज रात्री…”; इलियाना डिक्रूझने उघड केली होती तिची विचित्र सवय

एकाने लिहिलं, “हिचं लग्न कधी झालं?” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “या बाळाचे वडील कोण?” तर आणखी एकाने लिहिलं, “ही पोस्ट पाहिल्यानंतर मी लगेच शोधू लागलो ती हिने लग्न केल्याचं कधी जाहीर केलं होतं.” तिचा एक चहाता म्हणाला, “ती कदाचित मूल दत्तक घेणार असेल.” तर आणखी एक जण म्हणाला, “ही या बाळाच्या वडिलांचे नाव कधी सांगणार आहे?” त्यामुळे आता इलियानाची ही पोस्ट खूप चर्चेत आली आहे.

Story img Loader