इलियाना डिक्रूज ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चांगलीच चर्चेत असते. तर आता तिच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष तिच्याकडे वळवलं आहे. ती आई होणार असल्याचं तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जाहीर केलं आहे.
काही दिवसांपूर्वी, इलियाना कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियनला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ‘कॉफी विथ करण सीझन ७’मध्ये करणने याबद्दल भाष्य केलं होतं. पण इलियानाने आतापर्यंत त्याच्याशी लग्न केलेलं नाही. त्यानंतर आता इलियानाने गरोदरपणाची घोषणा करतातच तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
आणखी वाचा : इलियाना डिक्रुझला तमिळ सिनेसृष्टीतून केलं बॅन? अखेर सत्य आलं समोर
इलियानाने आज सकाळी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोन फोटो पोस्ट केले. पहिल्या फोटोत बाळाचे कपडे दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये ‘ममा’ असं लिहिलेली एक चेन दिसत आहे. हे फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, “कमिंग सून… तुला भेटण्याची मी आणखीन वाट पाहू शकत नाही माय लिटिल डार्लिंग.” पण ही पोस्ट शेअर करताना इलियानाने तिच्या बाळाच्या वडिलांची ओळख गुप्त ठेवली आहे.
हेही वाचा : “मला रोज रात्री…”; इलियाना डिक्रूझने उघड केली होती तिची विचित्र सवय
इलियानाची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. तिच्या होणाऱ्या बाळाचे वडील कोण जाणून घेण्यासाठी तिथे चाहते उत्सुक झाले आहेत. आता तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिचे चाहते, मनोरंजन सृष्टीतील तिचे मित्रमंडळी तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव करत आहेत.