अभिनेत्री इलियाना डिक्रूज सध्या या गोष्टीमुळे चांगलीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एक फोटो शेअर करत ती लवकरच आई होणार असल्याची बातमी चाहत्यांनी शेअर केली होती. तिने ही पोस्ट शेअर करताच सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. तिच्या होणाऱ्या बाळाचे वडील कोण, असा प्रश्न अनेकांनी तिला कमेंट करत विचारला. तर आता तिने एक फोटो शेअर करत होणाऱ्या बाळाच्या वडिलांसाठी एक खास पोस्ट केलेली आहे.

गरोदरपणाच्या घोषणेनंतर इलियाना सोशल मीडियावरून तिच्या आयुष्याबद्दलचे अपडेट्स चाहत्यांशी शेअर करत आहे. सध्या ती तिचं गरोदरपण चांगलंच एन्जॉय करताना दिसतेय. काही दिवसांपूर्वीच ती तिच्या बॉयफ्रेंड बरोबर बेबीमूनसाठी गेली. तर आता तिने तिच्या बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो शेअर करत तिच्या होणाऱ्या बाळाचे वडील कोण? याबद्दलची चाहत्यांच्या मनातली उत्सुकता आणखीनच वाढवली आहे.

आणखी वाचा : गरोदरपणाची घोषणा केल्यानंतर इलियाना डिक्रूजने पहिल्यांदाच शेअर केला बॉयफ्रेण्डबरोबरचा फोटो, म्हणाली…

इलियानाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. त्या दोघांचा हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत तिने लिहिलं, “प्रेग्नेंट होणं हा सुंदर आशीर्वाद आहे. हा आनंद अनुभवण्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. एक आयुष्य तुमच्यामध्ये मोठं होत आहे आणि ही भावना शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडची आहे.”

पुढे तिने लिहिलं, “जेव्हा मी स्वतःची काळजी घेवू शकत नाही, तेव्हा माझा बॉयफ्रेंड माझ्या सोबत असतो. माला जेव्हा अस्वस्थ वाटतं तेव्हा तो मला सांभाळून घेतो. कधी माझे अश्रू पूसतो, तर कधी त्याच्या विनोदबुद्धीने मला खूप हसवतो. जेव्हा मला त्याची गरज असते, तेव्हा तो मला प्रेमाने जवळही घेतो.”

हेही वाचा : “या बाळाचे वडील कोण?” अविवाहित इलियाना डिक्रुझने ती आई होणार असल्याचं जाहीर करताच नेटकऱ्यांना पडला प्रश्न; म्हणाले…

तर आता तिच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स करत तिचा बॉयफ्रेंड कोण असेल याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केला आहे. एकाने लिहिलं, “इतका सस्पेन्स तर आदिपुरुषमधील रावणामध्येही नाहीये, तितका हिच्या बॉयफ्रेंडमध्ये आहे.” तर दुसरा म्हणाला, “दाढीवरून मला हा रॉकी भाई वाटतोय.” तर आणखी एकाने लिहिलं, “हा तर रणबीर कपूरसारखा दिसतोय.” त्यामुळे इलियानाचा बॉयफ्रेंड नक्की कोण आहे हे जाणून घेण्यासाठी नेटकरी फार उत्सुक झाले आहेत.

Story img Loader