बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टबरोबर एक खळबळजनक प्रकार घडला आहे. तिच्या घराच्या समोरच्या इमारतीवरील गच्चीवरुन गुपचूप फोटो काढणाऱ्यांवर तिने संताप व्यक्त केला आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे. या घटनेनंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे आलियाला पाठिंबा देताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्री जान्हवी कपूर याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.
करण जोहर, अनुष्का शर्मा, अर्जुन कपूर यांच्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूरने या घटनेचा निषेध केला आहे. तिने पोस्ट शेअर करत आपला राग व्यक्त केला आहे. ती असं म्हणाली, हे अत्यंत चुकीचे आणि वाईट कृत्य आहे. “मी या लोकांना अनेकदा मनाई देखील केली आहे, तरीही ते माझ्या परवानगीशिवाय फोटो काढतात. जेव्हा मी जिममध्ये असतो तेव्हा ते माझ्याकडे आरशातून पाहतात आणि फोटो क्लिक करतात. काही जागा या खासगी असतात तिथे तरी या गोष्टी करू नयेत. मला समजते की हा तुमच्या कामाचा एक भाग आहे पण तुम्हाला हे समजले पाहिजे की गोष्टी परस्पर संमतीने घडतात.”
“सामान्य महिला असो किंवा…” आलिया भट्टच्याबाबतीत घडलेल्या ‘त्या’ प्रकारावर सेलिब्रेटी संतप्त
ती पुढें म्हणाली “आम्ही प्रसिद्ध व्यक्ती आहोत तुमचंही काम आहे, पण तुम्ही आमचे कुठेही फोटो काढाल असं नाही चालणार. संमतीशिवाय तुम्ही अशा प्रकारे कोणाच्या खाजगी जागेत ढवळाढवळ करत असाल तर ते चुकीचे आहे.” अशा शब्दात तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
-
jahvi
नेमकं प्रकरण काय?
आलिया भट्ट ही तिच्या लिव्हिंग रुममध्ये बसली होती. त्यावेळी तिला समोरच्या इमारतीवरील गच्चीवरुन दोन जण कॅमेरे घेऊन डोकावत असल्याचं तिला दिसलं. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर तिने हे फोटो पोस्ट करत संबंधित प्रसारमाध्यमासह पापाराझींना जाब विचारला.
“तुम्ही मस्करी करताय का? मी माझ्या लिव्हिंग रुममध्ये दुपारी निवांत बसले होते आणि तेव्हा मला जाणवलं की कोणीतरी मला पाहतंय. मी उठून पाहिलं तर समोरच्या इमारतीच्या गच्चीवरुन दोन व्यक्ती कॅमेरा लावून माझ्याकडे पाहत होते. हा प्रकार कोणत्या जगात मान्य आहे आणि हे असं करणं कितपत योग्य आहे? एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावणे ही सर्वात वाईट गोष्ट आहे. प्रत्येकाला एक मर्यादा असते, जी तुम्ही ओलांडू शकत नाही. पण आज मला हे म्हणावं लागतंय की तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहात”, अशी पोस्ट आलियाने केली होती.