बॉलिवूडचे कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जीवाचं रान करत असतात. आजच्या जमान्यात रिऍलिटी शो पासून ते मालिकांपर्यंत आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसून येत असतात. मालिका विश्व जेव्हा अस्तित्वात नव्हते तेव्हा कलाकारा मंडळी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी चित्रपटगृहात असतं. आजही काही कलाकार चित्रपटगृहांना अचानक भेट देत असतात. नुकतीच जान्हवी कपूर एका दिल्लीत एका मल्टीपेलक्समध्ये उपस्थित होती.

जान्हवी सध्या तिच्या आगामी मिली चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे, त्यानिमित्ताने ती ठिकठिकाणी प्रमोशनसाठी फिरत आहे. दिल्लीमधील एका मल्टिप्लेक्समध्ये गेली असताना तिथे तिने पॉपकॉर्न विकले. आज कोणत्याही मल्टीपेलक्समध्ये गेल्यावर हक्काची एक गोष्ट असते ती म्हणजे पॉपकॉर्न,
जान्हवीने पॉपकॉर्न जाते विकत होते तिकडचा ताबा घेत पॉपकॉर्न विकण्यास सुरवात केली. तिकडे काम करणारे कर्मचारी तिला मदत करत होते.

nikki tamboli trolled over bold video
बिग बॉस मराठी फेम निक्की तांबोळी ‘त्या’ बोल्ड व्हिडीओमुळे ट्रोल; नेटकरी म्हणाले, “ही आपली संस्कृती नाही”
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Maheep Kapoor gatecrashed Sanjay Kapoor party
‘वन नाईट स्टँड’साठी मद्यधुंद अवस्थेत पार्टीत शिरली, नशेतच त्याच्या कुटुंबाला…; कपूर कुटुंबाच्या सूनेने सांगितली लव्ह स्टोरी
onion shortage Mumbai
शंभरी गाठलेल्या कांद्यामुळे ग्राहक जेरीस, जाणून घ्या, शेतकऱ्यांना किती दर मिळतो, ग्राहकांना किती रुपये मोजावे लागतात
Jai-Veeru Swiggy's entry on Dalal Street welcomed by Zomato
“जय-वीरू!” दलाल स्ट्रीटवर स्विगीची एन्ट्री, झोमॅटोने केलं स्वागत! पाहा, Netflix, Amazon, Paytm, Coca Colaची भन्नाट प्रतिक्रिया
Radhika Deshpande
“सगळे दागिने विकले, पण मंगळसूत्र…”; अभिनेत्री राधिका देशपांडे काय म्हणाली?
In Vashis APMC market vegetable prices dropped due to increased arrivals
आवक वाढल्याने भाज्यांच्या दरात घसरण

‘कांतारा’ अंधश्रद्धेला खतपाणी घालतो का? रिषभ शेट्टी म्हणाला, “मी त्याबद्दल…”

यावेळी जान्हवी कोणत्याही ग्लॅमर्स अवतारात दिसली नाही तर तिने चक्क हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. एम्ब्रॉडरी पद्धतीची ही साडी होती यावर तिने मेटॅलिक गोल्ड रंगाचे ब्लाउज परिधान केले होते. डॅनग्लर पद्धतीचे कानातले घातल्याने तिचा हा लूक खूपच वेगळा वाटत होता. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिने वेगवेगळ्या पद्धतीचे लूक केले होते.

जान्हवी सध्या तिच्या आगामी ‘मिलि’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातून प्रथमच जान्हवी वडील बोनी कपूर यांच्याबरोबर काम करणार आहे. मिलि’ ४ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘धडक’ या चित्रपटातून जान्हवीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतरही तिने ‘गुंजन सॅक्सेना’, ‘रुही’, ‘गुड लक जेरी’ अशा विविध चित्रपटातून कामं केली.