अभिनेत्री जया बच्चन या त्यांच्या रागीट स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा त्या त्यांच्याबरोबर फोटो काढू इच्छिणाऱ्यांवरती, मीडिया फोटोग्राफर्सवरती चिडचिड करताना दिसतात. अनेकदा राज्यसभेतही त्यांना त्यांचा राग अनावर होतो. आता त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे त्या पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाणावर आले आहेत.
जया बच्चन यांना त्यांच्या रागामुळे अनेकदा ट्रोल केलं जातं. समाजवादी पक्षाच्या खासदार असलेल्या जया बच्चन राज्यसभेत देखील बेधडकपणे त्यांची मतं मांडताना दिसतात. आता राज्यसभेतील त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात त्या उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याकडे बोट दाखवून काहीतरी बोलताना दिसल्या.
आणखी वाचा : “बिग बी कसे आणि तुम्ही…”, जया बच्चन यांच्यावर नेटकरी नाराज, जाणून घ्या नेमकं काय घडलं
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत जया बच्चन अत्यंत रागावलेल्या दिसत आहेत. हाच राग अनावर झाल्यामुळे त्या उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड त्यांच्याकडे बोट दाखवून काहीतरी पुटपुटताना दिसल्या. आता जया बच्चन यांनी थेट उपराष्ट्रपतींकडे बोट दाखवून बोलल्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीका केली जात आहे.
या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकरांनी प्रतिक्रिया देत त्यांच्या या कृतीचा निषेध केला. एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “जया बच्चन यांनी रागाची सीमा पार केली आहे.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “इतका राग येणं बरं नाही.” यासोबतच एक नेटकरी एक फोटो शेअर करत म्हणाला, ” या बाईला ५० वर्ष सहन केल्याबद्दल अमिताभ बच्चन यांना भारतरत्न आणि परमवीर चक्र असे दोन्ही पुरस्कार द्यायला हवेत.” जया बच्चन यांचा हा व्हिडिओ सध्या तुफान वायरल होत आहे.