अभिनेत्री जया बच्चन यांना त्यांच्या अभिनयाबरोबर रागीट स्वभावासाठी ओळखले जाते. त्या सतत चिडचिड करताना, पापाराझींवर भडकतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता जया बच्चन यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात त्या पुन्हा एकदा फोटो काढणाऱ्यांवर संतापल्याचे दिसत आहेत.
नुकतंच मुंबईत रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. यानिमित्ताने सिनेसृष्टीतील काही दिग्गज लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जया बच्चन, त्यांची मुलगी श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी हजेरी लावली. यावेळीचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.
आणखी वाचा : “एक आई आणि पत्नी म्हणून…” सिनेसृष्टीतून ब्रेक घेण्याबद्दल जया बच्चन यांचे स्पष्ट उत्तर
या व्हिडीओत काही पापाराझी जया बच्चन यांना फोटोसाठी ओरडताना दिसत आहे. जया जी, जया जी असे ते बोलताना दिसत आहेत. त्याचवेळी जया बच्चन या मागे वळून पाहतात आणि “मला ऐकू येतं. मी बहिरी नाही. थोडं हळू बोला’, असे रागात बोलतात.
यानंतर श्वेता बच्चन आणि अभिषेक बच्चन आल्यावर त्या निघून जातात. जया बच्चन यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे.
“याच कारणामुळे आम्हाला रेखा आवडतात. त्या अजिबात भडकत नाही आणि अॅटिट्यूडही दाखवत नाहीत”, असे एकाने कमेंट करत म्हटले आहे. “त्या शाळेची मुख्याध्यापिका असल्याप्रमाणे वागतात”, अशी कमेंट एकाने केली आहे. “हिच्याबरोबर ऐश्वर्या कशी राहत असेल”, असे एकाने कमेंट करत विचारले आहे.