सध्या सेलिब्रिटी मंडळी ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये रमले आहेत. सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या ख्रिसमस सेलिब्रेशनचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. अभिनेत्री काजल अग्रवालही तिच्या कुटुंबियांबरोबर ख्रिसमस सेलिब्रेशन करत आहे. यादरम्यानचे काही फोटो तिने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. नवऱ्यासह काजलचा हा फोटो चर्चेचा विषय ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “रणवीर सिंगच्या नादी लागू नको” असा ड्रेस परिधान करताच सिद्धार्थ जाधव ट्रोल, नेटकऱ्यांनी केल्या मजेशीर कमेंट

काजल व तिचा पती गौतम किचलूचा लिपलॉक करतानाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. तिला काहींनी ट्रोलही केलं आहे. तर तिच्या चाहत्यांनी आमचं तू मन दुखावलंस असं कमेंटच्या माध्यमातून म्हटलं आहे.

गौतमने एका हातात मुलाला उचललं आहे. तर दुसरीकडे त्याने काजलला घट्ट मिठी मारत लिपलॉक केलं आहे. या दोघांचा हा फोटो अगदी रोमँटिक आहे. काजलने हा फोटो शेअर करत म्हटलं की, “ऑल आई वांट फॉर ख्रिसमस.” तिच्या या फोटोला नेटकऱ्यांनी अधिकाधिक पसंती दर्शवली आहे.

आणखी वाचा – नवऱ्याने केलेल्या अश्लील इशाऱ्यानंतर मानसी नाईकची पोस्ट, बोल्ड फोटो शेअर करत म्हणाली, “मला कमी लेखू नका”

काजलने यावेळी जीन्स, आकाशी रंगाचं स्वेट जॅकेट परिधान केलं होतं. तर तिचा पतीही वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे. काजल आणि गौतम यांनी ३० ऑक्टोबर २०२० रोजी लग्न केले. मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. काही कलाकरांनी देखील त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. काजल आणि गौतम जवळपास ७ वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress kajal agrawal christmas celebration with family gets trolled for liplock with husband see photos kmd