गेल्या काही दिवसांपासून काजोलचा चित्रपट ‘सलाम वेंकी’ची चर्चा सुरु आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटाच्या पोस्टवरूनच प्रेक्षकांमध्ये ‘सलाम वेंकी’बाबत उत्सुकता वाढली. चित्रपटाच्या ट्रेलरची सारेच जण वाट पाहत होते. आता अखेरीस या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. काही तासांमध्येच या ट्रेलर प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – “बाजीराव पेशवे छत्रपतींची गादी बळकावू शकले असते पण…” शरद पोंक्षेंनी करून दिली इतिहासाची आठवण

‘सलाम वेंकी’चा ट्रेलर पाहता चित्रपटाची कथा आई व मुलाच्या नात्यावर आधारित असल्याचं दिसून येतं. सुजाता (काजोल) व तिचा मुलगा वेंकी (विशाल जेठवा) यांच्या एकत्रित सीनपासूनच चित्रपटाच्या ट्रेलरला सुरुवात होते. वेंकीला कधीही बरा न होणाऱ्या आजाराची लागण होते.

हा आजार वेंकीला मरणाच्या अधिक जवळ आणणारा असतो. पण यासगळ्या परिस्थितीला त्याची आई मात्र मोठ्या हिंमतीने सामोरी जाते. लेकाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यास त्याची आई नकार देते. ती इच्छा काय असते? चित्रपटाच्या कथेला नेमकं काय वळण मिळतं हे चित्रपटामध्येच पाहायला मिळेल.

आणखी वाचा – “…म्हणून मी तुमची आई होत नाही”; माजी पॉर्नस्टार मिया खलिफा संतापली

चित्रपटाच्या अखेरीस आमिर खानची झलक पाहायला मिळते. आमिर या चित्रपटामध्ये पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. पण त्याची या चित्रपटामधील झलक पाहून प्रेक्षक खूश झाले आहेत. शिवाय राजीव खंडेलवाल, प्रकाश राज या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. रेवतीने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट येत्या ९ डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.