बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री काजोल देवगणने तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. काजोलने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या काजोलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काजोलला वांद्रे येथे स्पॉट करण्यात आलं होतं. एका दुकानातून बाहेर पडून काजोल फुटपाथवरुन तिच्या गाडीकडे जात असताना रस्त्यावरील छोट्या गरीब मुलीने तिच्यामागोमाग येत पैसे मागितले. काजोलने गाडीत बसल्यानंतर पॉकेटमधून काही नोटा काढून तिला दिल्या. गाडीतील ड्रायव्हर काहीतरी म्हणाल्यानंतर काजोल त्याला छोटी मुलगी आहे, असं म्हणाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. ते पाहून तिच्याबरोबर असलेला दुसरा मुलगाही काजोलकडे पैसे मागू लागला. परंतु, काजोल तिथून निघून गेली. ‘विरल भय्यानी’ या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा >> साजिद खानची ‘बिग बॉस’च्या घरातून हकालपट्टी करण्यासाठी शर्लिन चोप्राचं केंद्रीय मंत्र्याला पत्र, म्हणाली…

हेही वाचा >> मराठी अभिनेत्रीने १०×२०च्या जागेत बांधलं नवं घर, पोस्ट शेअर करत म्हणाली “दोन वर्षांपासून…”

काजोलच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. काजोलने दुसऱ्या मुलाला पैसे न दिल्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे. तर काहींनी गरीब मुलीला पैसे दिल्याबद्दल तिचं कौतुकही केलं आहे.

हेही वाचा >> “भीमराया…”, लंडनमधील आंबेडकरांच्या निवासस्थानाचा फोटो पोस्ट करत गौरव मोरेने शेअर केली खास पोस्ट

काजोल लवकरच ‘सलाम वेंकी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘रॉकी और राणी की प्रेमकहानी’ या करण जोहरच्या चित्रपटात ती शाहरुख खानसह कैमिओ करणार असल्याची चर्चा आहे. येत्या वर्षात काजोल वेब सीरिजमध्येही दिसण्याची शकत्या आहे. ‘त्रिभंगा’ चित्रपटातून तिने ओटीटीवर पदार्पण केलं होतं.  

Story img Loader