बॉलीवूड अभिनेत्री काजोल ही नेहमीच तिच्या दिलखुलास स्वभावामुळे ओळखली जाते. तिची स्टाइल, तिचा ग्लॅमरस अंदाजही प्रत्येक वेळी सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. बऱ्याच वेळा तिच्या स्टाइलचं कौतुक केलं जातं. पण काही वेळा तिला त्यावरून ट्रोलही करण्यात येतं. आता तिच्या एका नवीन लूकमुळे तिला पुन्हा एकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
काजोल सध्या तिच्या आगामी ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमुळे चांगली चर्चेत आहे. या सीरिजच्या माध्यमातून ती ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर लॉन्च सोहळ्यादरम्यान काजोलने परिधान केलेले कपडे अनेकांना आवडले नाहीत आणि त्यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.
आणखी वाचा : “कायम नशेमध्ये…,” लंडनमधील ‘त्या’ व्हायरल फोटोंमुळे अजय देवगण-काजोलची लेक नीसा ट्रोल
‘द ट्रायल’ या वेब सीरिजचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच मुंबईत संपन्न झाला. या वेळी काजोलने लाल रंगाचा पूर्ण हात असलेला एक वन पीस परिधान केला होता. तर त्याला कमरेला बांधायला एक मोठी लाल रंगाची नाडीही होती. काजोलचा हा लूक नेटकऱ्यांना आवडला नाही आणि त्यांनी या व्हिडीओवर कमेंट करत तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
एकाने लिहिलं, “एवढी वेगाने का चालते आहे? युद्ध करायचं आहे का?” दुसऱ्याने लिहिलं, “ही बाथरोब घालून का आली आहे!?” तर आणखी एकाने लिहिलं, “पोहल्यानंतर आपण जसे कपडे घालून येतो तसा हिचा ड्रेस आहे.” आणखी एक म्हणाला, ” प्रमोशनसाठी हे लोक काहीही करतात.” काजोलचा हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे.