अभिनेत्री काजोल बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. आपल्या अभिनय कौशल्याने काजोलने एकेकाळी बॉलिवूड गाजवले आहे. तिने वयाच्या १६ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिल्यावहिल्या चित्रपटाने काजोलला चांगली ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिचा ‘बाजीगर’ हा चित्रपट हिट ठरला आणि काजोलचे संपूर्ण आयुष्य बदलले. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम करत स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. काजोलला तिच्या रंगावरुन अनेकदा टोमणे मारण्यात आले. त्यावरुन एका मुलाखतीत काजोलने उघडपणे भाष्य केले होते.

काजोलने काही वर्षांपूर्वी एका चॅट शो ला मुलाखत दिली. त्यावेळी तिने तिला रंगावरुन कराव्या लागलेल्या संघर्षाबद्दल भाष्य केले. “मला सिनेसृष्टीत अनेकदा डार्क आणि फॅट म्हटलं जायचं. त्याबरोबरच मी कायम चष्मा घालायचे, त्यावरुनही मला सुनावलं गेलं. पण मला या गोष्टींचा ताण कधीच जाणवला नाही. मला माहिती होते की मी शांत, हुशार आहे. तसेच जे माझ्याबद्दल नकारात्मक टीका करतात त्या सर्व लोकांपेक्षा मी चांगली आहे.”
आणखी वाचा : “मला कधीही सिनेसृष्टीत यायचे नव्हते त्याऐवजी…”; ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर काजोलने केला खुलासा

Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास

“मला माझ्या चेहऱ्याच्या रंगावरुन विविध गोष्टींचा सामना करावा लागला. मी खरंच खूप सुंदर होते. मी ३२-३३ वर्षांची असताना आरशात पाहायला सुरुवात केली आणि त्यानंतर मी स्वत:ला सांगितले की तू जशी आहेस तशीच खूप सुंदर दिसते. त्यामुळे मी जशी होते, तशीच कायम राहिले. जोपर्यंत एखाद्या गोष्टीवर विश्वास बसत नाही, तोपर्यंत ती गोष्ट खोटी असल्याचे लोकांना वाटते”, असा टोलाही काजोलने लगावला.

आणखी वाचा : ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटात लतादीदी ते बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची नाव समोर, पाहा त्यांची झलक

यावेळी काजोलला तू गोरं होण्यासाठी कोणतीही शस्त्रक्रिया केलीस का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर स्पष्टपणे नकार देत ती म्हणाली, “मी कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट घेतलेली नाही. आता मी फक्त उन्हात जात नाही. त्यापासून दूर राहते. माझ्या करिअरमधील १० वर्ष मी सातत्याने उन्हात काम करत होते. त्यामुळे माझी त्वचा टॅन झाली होती. आता मी उन्हात काम करणं बंद केलं आहे. त्यामुळे टॅनिंग अजिबात होत नाही. ही कोणतीही शस्त्रक्रिया नाही तर घरी राहण्याची कमाल आहे.”