करोनानंतर दोन वर्षांनी सर्व सण-उत्सव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा करायला मिळत आहेत. सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूमधाम आहे. मागील दोन वर्ष सण समारंभ अगदी साध्य पद्धतीने साजरे करण्यात आले होते. सध्या नवरात्र उत्सव सुरु आहे. ठिकठिकाणी देवीची पूजा केली जात आहे. दांडिया गरब्याचे आयोजन केले जात आहे. सामान्य माणसांप्रमाणे हा उत्सव बॉलिवूड सेलिब्रेटीदेखील उत्सहात साजरा करत आहेत. अभिनेत्री काजोलने नुकतीच जुहूमधील एका दुर्गा पूजेला आपली हजेरी लावली होती. या दुर्गा पूजेत तिच्याबरोबरोबरीने अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी उपस्थित होते. अभिनेत्री राणी मुखर्जी, ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चनदेखील उपस्थित होत्या.
या दुर्गापूजेनंतर कलाकारांनी पत्रकारांशी संवाद साधला. अभिनेत्री काजोल आणि राणी या दोघीनी एकत्र राहून पत्रकारांना फोटो काढून दिले. फोटो काढून झालयावर काजोलने पत्रकारांना टोला लगावला, ‘ती म्हणाली हे लोक आपले फोटोज काढत नाहीत काही कामाचे नाहीत हे लोक, मला एकही फोटो आजवर मिळालेला नाही’. असं म्हणत तिने पत्रकारांना सुनावले. काजोल राणी यांचे एक वेगळं नातं आहे. दोघी एकमेकींच्या नात्याने बहिणी लागतात. ‘कुछ कुछ होता हैं’ चित्रपटात दोघीनी एकत्र काम केले होते. दोघी बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष कार्यरत आहेत.
अभिनेत्री काजोल ‘तान्हाजी’ चित्रपटात २०२० साली मोठ्या पडद्यावर दिसली होती त्यानंतर ती ‘त्रिभंग’ या नेटाफिल्क्सवर प्रदर्शत झालेल्या चित्रपटात दिसली होती, तसेच ती ‘सलाम वेंकी’ नावाच्या चित्रपटात लवकरच दिसणार आहे. अभिनेत्री राणी मुखर्जीने निर्माता आदित्य कपूरशी लग्न केले आहे. ‘बंटी बबली या चित्रपटात ती सैफ अली खानबरोबर शेवटची दिसली होती.