सध्या सर्वत्र नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. सिनेविश्वातही हा सण खास पद्धतीने साजरा केला जातो आणि अनेक कलाकार देवीच्या दर्शनासाठी कुठे ना कुठे जातात. नुकतीच बॉलीवूड सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल लालबाग येथील दुर्गा देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली. तिने देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.
आणखी वाचा : पाचव्यांदा बदलण्यात आली अजय देवगणच्या ‘मैदान’ची रिलीज डेट, समोर आले कारण
काजोलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काजोलचा हा व्हिडिओ व्हायरल विरल भायानीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. देवीच्या दर्शनाला जाताना काजोलने पिवळ्या रंगाची साडी नसली असून पारंपरिक पद्धतीने ती तिथे वावरताना दिसतेय. यासोबत तिने कॅमेऱ्यासमोर पोजही दिल्या आहेत.
काजोलने एकटीनेच देवीचे दर्शन घेतले नाही, मी यावेळी तिच्याबरोबर तिची बहीण अभिनेत्री तनिषा होती. देवीच्या दर्शनाला गेल्यावर या दोघीही देवीच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे दिसून आले. काजोलच्या या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स मिळाले असून हा आकडा सातत्याने वाढत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहते तिच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत.
हेही वाचा : “…तर आज ही वेळ आली नसती,” रात्री केलेल्या एका कृतीमुळे काजोल झाली ट्रोल
२०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात काजोल मोठ्या पडद्यावर शेवटची दिसली होती. या चित्रपटात अजय देवगण आणि सैफ अली खान, शरद केळकर यांच्याही भूमिका होत्या. तर २०२१ मध्ये तिचा ‘त्रिभंगा’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता. येत्या काही दिवसांत काजोल ‘सलाम वेंकी’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. तसेच डिस्नी प्लस हॉटस्टारच्या आगामी मालिका ‘द गुड वाईफ’मध्येही काजोल मुख्य भूमिकेत दिसणार आहे.