अभिनेत्री आणि दिग्दर्शिका कंगना रणौत ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. बॉलिवूडवर आगपाखड असो किंवा राजकीय भूमिका मांडणं असो कंगना बेधडकपणे तिचे विचार मांडते. नुकतंच कंगनाने ‘आज तक’च्या वृत्तवाहिनीच्या ‘पंचायत आजतक’ या कार्यक्रमात हजेरी लावली. या मुलाखतीमध्ये कंगना नेहमीप्रमाणे तिच्या खरमरीत शैलीत उत्तरं दिली. ट्विटर, बॉलिवूड, नेपोटीजम, साऊथचे चित्रपट, राजकारण अशा विविध गोष्टींवर कंगनाने भाष्य केलं आहे. इतकंच नाही तर “मी ट्विटरवर परत आली तर खूप खळबळ होईल” असंही कंगना या कार्यक्रमात म्हणाली.

कंगनाने या मुलाखतीमध्ये तिचे राजनैतिक संबंध आणि कुटुंब याविषयी खुलासा केला. शिवाय हे सांगताना तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खूप प्रशंसा केली. शिवाय राजकीय गोष्टींमध्ये असलेल्या रुचिबद्दलही कंगनाने स्पष्टीकरण दिलं आहे. याच मुलाखतीमध्ये तिला “राजकाणात येऊन भाजपासाठी पुढील निवडणुकित सहभागी होणार का?” असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर तिने अत्यंत स्पष्ट आणि योग्य असं उत्तर दिलं.

आणखी वाचा : साजिद खानच्या डोक्यावर सलमान खानचा हात; अभिनेत्री शर्लिन चोप्राने केला खळबळजनक आरोप

कंगना म्हणाली, “मला स्वतःला मनापासून इच्छा नाही, पण जर हिमाचलमधील लोकं आणि राजकीय पक्षाला असं वाटत असेल मी मंडीमधून निवडणूक लढवावी तर मी त्यासाठी तयार आहे. पण राजकारणात मुरलेल्या इतर लोकांनी पुढे यावं अशी माझी इच्छा आहे. जे खरंच या क्षेत्रात प्रचंड मेहनत घेत आहेत त्या लोकांनी यासाठी पुढे यायला हवं असं मला मनापासून वाटतं.”

या मुलाखतीमध्ये कंगनाने हळूच इशारा दिल्याची चर्चा सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. याबरोबरच तिने मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यात होणाऱ्या तुलनेवरही टीका केली आहे, पंतप्रधान मोदी यांच्याशी सध्या स्पर्धा करू शकेल असं कुणीच नाहीये असं कंगनाने ठामपणे सांगितलं आहे.कंगना इंदिरा गांधी यांच्यावर बेतलेल्या चारित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. शिवाय या चित्रपटाचं दिग्दर्शनही तीच करणार आहे. तिचा फर्स्ट लूक लोकांना चांगलाच आवडला आहे आणि तिच्या या चित्रपटासाठी सगळेच उत्सुक आहेत.

Story img Loader