बॉलिवूडमधील अभिनेते, अभिनेत्री कायमच चर्चेत असतात. वेळोवेळी आपल्या भूमिका त्या स्पष्टपणे मांडत असतात. यातील एक कलाकार म्हणजे कंगना रणौत. अनेकदा बॉलिवूड आणि राजकारणातील घडामोंडीवर कंगना तिचं मत स्पष्टपणे मांडताना दिसते. तिच्या वक्तव्यांमुळे कित्येकदा ती वादाच्या भोवऱ्यातही अडकलेली आहे. काही दिवसांपूर्वी कंगना रणौत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार अशी चर्चा होती मात्र नुकतीच कंगनाने हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.
कंगनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पोस्ट करत ही माहिती दिली. तिने पोस्टमध्ये लिहले आहे आज माननीय मुख्यमंत्री श्री जयराम ठाकूर यांची भेट त्यांच्या निवासस्थानी झाली. त्यांचे साधेपण आणि हिमाचलच्या लोकांबद्दलचे प्रेम या दोन्ही भावना प्रेरणात्मक आहेत. अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. जयराम ठाकूर हे सध्याचे मुख्यमंत्री आहेत. ते भारतीय जनता पक्षातले आहेत. मंडी जिल्ह्यातील सिराज विधानसभा मतदारसंघातून ते हिमाचल प्रदेशच्या विधानसभेवर निवडून आले आहेत. १९९८ पासून ते हिमाचल प्रदेश विधानसभेत आमदार आहेत. तिच्या या भेटीमुळे ती राजरकारणात येणार अशी चर्चा आहे मात्र तिने अद्याप कोणती घोषणा केली नाही.
“या महाराष्ट्राने मला … ” जेव्हा अमिताभ बच्चन ‘या’ मराठी चित्रपटात झळकले होते
कंगनाने नुकतीच मथुरेतील बाके बिहारी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले होते. धाकड या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. या चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही. कंगनाने याआधी ‘थलायवी’, ‘सिमरन’ आणि ‘तनु वेड्स मनु रिटर्न्ससारखे’ हिट चित्रपट दिले आहेत.
कंगना ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तिने स्वत: या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘इमर्जन्सी’ चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, अनुपम खेर यांसह अभिनेत्री महिमा चौधरी महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे.