बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान आणि पती सैफ अली खान यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. करीना ही स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती कायमच तिचे वैयक्तिक आयुष्य आणि करिअर याबद्दल मत मांडताना दिसते. करीना कपूरचे सासू आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याबरोबर खूप चांगले बान्डिंग आहे. त्या दोघीही अनेकदा एकमेकांबद्दल भाष्य करत असतात. नुकतंच सैफ अली खानची आई आणि करीनाची सासू शर्मिला टागोर यांनी करीनाचा एक किस्सा सांगितला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शर्मिला टागोर यांनी नुकतंच एका रेडिओ टॉक शो हजेरी लावली. यावेळी त्यांच्या त्यांची सून करीनाबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. तसेच त्यांना सैफ, त्यांची नातवंड आणि संपूर्ण कुटुंबाबद्दल विचारण्यात आले. यावर त्यांनी मनमोकळेपणाने भाष्य केले.
आणखी वाचा : “मी माझ्या पतीबरोबर…” लग्नानंतर करीना कपूरचा मोठा खुलासा

यावेळी शर्मिला टागोर म्हणाल्या, “मला एकदा करीनाने मुलगी आणि सून यातील फरक विचारला होता. त्यावेळी मी तिला यातील फरक सांगितला होता. ज्यांची तुमच्या घरात वाढ होते, त्यांना मुली म्हटलं जातं. तुम्हाला त्यांचा स्वभाव चांगल्या पद्धतीने समजतो आणि माहिती असतो. तिला कोणत्या गोष्टी आवडतात, तिला कोणत्या गोष्टींचा राग येतो याबद्दल तुम्हाला माहिती असते. तसेच तिला कशा पद्धतीने हाताळायचे आणि कोणत्या पद्धतीने तिच्याशी वागायचे याचीही तुम्हाला कल्पना असते.”

“पण सून या शब्दाचा अर्थ वेगळा असतो. तुम्हाला तिचा स्वभाव माहिती नसतो. अशा परिस्थितीत तिला ओळखण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागतो. जेव्हा एखादी नवीन मुलगी तुमची सून म्हणून तुमच्या घरी येते, तेव्हा तिचे चांगल्या पद्धतीने स्वागत करणे हे तुमचे कर्तव्य असते. तिला आरामदायक वाटलं पाहिजे. तसेच तुम्ही तिची काळजी घेतली पाहिजे. तसेच तुम्ही मुलगा आणि सूनेच्या नात्याला पूर्ण वेळ द्यायला हवा. त्यांचे नाते समजून घ्यायला हवं”, असेही शर्मिला टागोर यांनी म्हटले.

आणखी वाचा : “ही वेळ आपल्या घरच्या मुलीवरही येऊ शकते”, प्रसिद्ध इन्स्टा स्टारची व्हायरल अश्लील व्हिडीओप्रकरणी पोलिसांत धाव, म्हणाली “लोकांना मजा मारायला…”

दरम्यान करीना ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आतापर्यंत ‘थ्री इडियट्स’, ‘बजरंगी भाईजान’, ‘जब वी मेट’ असे अनेक चित्रपट केले आहेत. सध्या ती तिच्या आगामी ‘द क्रू’ या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत तब्बू आणि क्रिती सेनॉन दिसणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress kareena kapoor asks sharmila tagore difference between daughter and daughters in law saif ali khan mother reply nrp