बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडपं म्हणजे सैफ अली खान, करीना कपूर आगामी चित्रपटात दिसणार ‘या’ विशेष भूमिकेत, लंडनमध्ये होणार चित्रीकरण कायमच चर्चेत असते. एकेमकांनावरचे प्रेम ते कायमच व्यक्त करत असतात. दोघे सोशल मीडियावर सक्रिय असतात. ‘टशन’ चित्रपटापासून दोघांच्या प्रेमप्रकरणाला सुरवात झाली. प्रेमाचे रूपांतर खरे लग्नात झाले. १६ ऑक्टोबर २०१२ साली दोघांनी लग्नगाठ बांधली. दोन मुलांचे ते आईवडील आहेत. करीनाने लग्नानंतरदेखील आपले करियर सुरु ठेवले आहे. नुकताच तिने पिंकव्हीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या आगामी चित्रपटांबद्दल माहिती दिली आहे.

करीन कपूरने मुलाखतीत सांगितले की ‘मी कायमच माझ्या कुटुंबाला प्राध्यान दिले आहे. माझा नवरा, माझी मुलं, माझे पालक, माझी बहीण हे माझ्यासाठी सर्वकाही आहे’. मुलांची काळजी कोण घेत या प्रश्नावर करीना पुढे म्हणाली, ‘एक पालक नेहमीच त्यांच्याबरोबर असतो. सैफने आदिपुरुष चित्रपट संपवला आहे आता माझी काम करण्याची वेळ आली आहे. मला माहित आहे की आमचा हा प्रवास वळणांचा आहे जो अजूनही अवघड आहे. हे करणे सर्वात कठीण आहे.’ या जोडीला प्रेक्षकांनी पडद्यावर पसंत केले आहे, मात्र त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यात रस असतो.

करीना कपूर आगामी चित्रपटात दिसणार ‘या’ विशेष भूमिकेत, लंडनमध्ये होणार चित्रीकरण

नुकताच तिचा आमिर खान बरोबरच ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. राष्ट्रीय पुरस्कार विजेते हंसल मेहता पहिल्यांदाच करीना कापूरबरोबर काम करणार आहेत. त्यांनी ‘अलिगढ’, ‘छलांग’, ‘ओमेरात’ यांसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात करीना मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात ती एका गुप्तहेराची भूमिका साकारणार आहे. चित्रीकरणासाठी अभिनेत्री करीना कपूर खान लंडनला रवाना झाली आहे.

करीना आणि सैफ अली खान यांनी LOC कारगिल (२००३) आणि ओंकारा (२००६) मध्ये एकत्र काम केले होते. करीनाने सैफच्या नावाचा एक टॅटूदेखील आपल्या हातावर काढला होता. करीना आणि सैफने २०१६ मध्ये त्यांनी आपल्या पहिल्या मुलाला तैमूरला जन्म दिला तर मागच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाला म्हणजे जहांगीरला जन्म दिला.