अभिनेत्री करीना कपूर ही तिच्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिथे ती विविध फोटोही पोस्ट करत असते. नुकताच तिचा क्रू हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. अशात बकरी ईदच्या दिवशी नवरा सैफसह एक फोटो पोस्ट करणं करीनाला चांगलंच महागात पडलं आहे. अनेकदा ती जेह आणि तैमूर या दोघांसह फोटो शेअर करते. पण यावेळी सैफ बरोबर तिने फोटो शेअर केलाय आणि या फोटोवरुन करीनाला ट्रोल करण्यात येतं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे फोटोत?

करीनाने सैफ अली खानसह हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत दोघंही कूल मूडमध्ये दिसत आहेत. काहींना हे फोटो आवडले आहेत. तर अनेकांनी या फोटोंवर टीका केली आहे. करीनाने एकूण चार फोटो पोस्ट केले आहेत. यातल्या पहिल्या फोटोंत करीना आणि सैफ दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत पिझ्झा आहे. तिसऱ्या फोटोत सैफ आणि करीना यांनी त्यांच्या सावलीचा फोटो पोस्ट केला आहे. तर चौथ्या फोटोत करीनाने सैफचा हात पकडला आहे. या फोटोत जे ब्रेसलेट दिसतं आहे त्यावर बेटर टुगेदर असं लिहिलं आहे. पिझ्झा खाऊन चालणारं कपल असं कॅप्शन करीनाने दिलं आहे. या पोस्टवर काहींनी पसंती दर्शवली आहे तर अनेकांनी करीनाला ट्रोल केलं आहे.

काय म्हणत आहेत नेटकरी?

याला म्हणतात प्रेम असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर भाभी ईद मुबारक तरी करा असं म्हणत आणखी एका नेटकऱ्याने संताप व्यक्त केला आहे. मी या पोस्टच्या प्रेमात पडल्याचं एकाने म्हटलं आहे. तर म्हातारा-म्हातारीला झालंय काय? असं एकाने म्हटलं आहे. बेबोला आज कुणी मटण दिलं नाही वाटतं त्यामुळे ती पिझ्झा खाते आहे असंही एकाने म्हटलं आहे.

हे पण वाचा- “मी खूप वाईट बाबा आहे”, असं का म्हणाले होते करिश्मा आणि करीना कपूरचे वडील?

काही दिवसांपूर्वी सैफ अली खानने त्याच्या हातावर लिहिलेला करीना या नावाचा टॅटू मिटवला होता. त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र करीनाने आता जो फोटो पोस्ट केला आहे, त्यावरुन विविध चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. बेटर टुगेदर असं लिहिलेलं ब्रेसलेट करीनाने घातलं आहे. त्यामुळे विविध चर्चा आता थांबल्या आहेत.

२०१२ मध्ये सैफ-करीना यांचा विवाह

२०१२ मध्ये सैफ आणि करीना यांनी लग्न केलं. त्याआधी दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्याने करीना हिच्यासोबत लग्न केलं. आता सैफ अली खान दुसऱ्या संसारात आनंदी आहे. अनेकदा सैफ पत्नी करीना आणि दोन मुलांसोबत व्यस्तवेळापत्रकातून वेळ काढत फिरायला देखील जात असतो. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सैफ आणि करीना यांच्या मोठ्या मुलाचं नाव तैमूर अली खान तर लहान मुलाचं नाव जेह अली खान असं आहे. तैमूर आणि जेह देखील सेलिब्रिटी किड्स म्हणून प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress kareena kapoor post romantic photo with husband saif ali khan but fans gets angry on her post scj