बॉलिवूड अभिनेत्री करीश्मा कपूरने अभिनयाने ९०चं दशक गाजवलं होतं. ‘दिल तो पागल है’, ‘राजा हिंदुस्थानी’, ‘हम साथ साथ है’, ‘राजा बाबू’, ‘कुली नं १’ अशा चित्रपटातून तिने अभिनयाचा ठसा उमटवला. ९०च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या करिश्माचा पार्टीतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करिश्मा कपूरचा ‘दिल तो पागल है’ हा चित्रपट फार गाजला होता. या चित्रपटात तिच्यासह शाहरुख खान व माधुरी दीक्षितही मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील गाणीही बरीच लोकप्रिय ठरली होती. ‘दिल ले गयी’ या गाण्याने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. १९९७ साली करिश्माचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

हेही वाचा >> ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून तेजस्विनी लोणारीची एक्झिट; कारण ठरतंय चर्चेचा विषय

हेही वाचा >> Video: ‘बिग बॉस’च्या घरात जेवणावरुन वाद, अर्चनाने शिवच्या भरलेल्या ताटामधून चपाती उचलली अन्…; व्हिडीओ व्हायरल

तब्बल २४ वर्षांनंतर पुन्हा एकदा करिश्मा कपूर ‘दिल ले गयी’ या गाण्यावर थिरकताना दिसली. तिचा या गाण्यावर डान्स करतानाचा एका पार्टीतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका फॅन पेजवरुन करिश्माचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

हेही पाहा>> Photos: पुण्याच्या Golden Guysचा नादखुळा! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी अन्…; ‘गोल्डन कार’ कलेक्शन पाहिलंत का?

एका मैत्रिणीच्या बॅचलर्स पार्टीतील हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये करिश्मा तिच्या मैत्रिणींसह ठुमके लावताना दिसत आहे. पार्टीत करिश्माने काळ्या ड्रेसमधील ग्लॅमरस लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतल्याचंही दिसत आहे.