अभिनेत्री कतरिना कैफ ‘टायगर ३’ या चित्रपटाच्या यशानंतर नवीन वर्षांत लवकरच ‘मेरी ख्रिसमस’ या थरारपटात दिसणार आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती देखील मुख्य भूमिकेत आहे. ख्रिसमसच्या संध्याकाळी भेटलेल्या दोन तरुणांची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. त्यांच्या भूतकाळात घडलेल्या रहस्यमयी घटनांमुळे ख्रिसमसच्या दिवशी या दोन तरुणांचे संपूर्ण जग कशाप्रकारे बदलले जाते हे या चित्रपटातून श्रीराम राघवन यांनी दाखवले आहे. कतरिना कैफ आणि विजय सेतुपतीसह या चित्रपटात संजय कपूर, राधिका आपटे, विनय पाठक, टीनु आनंद यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा २०२४ मध्ये प्रदर्शित होणारा पहिला हिंदी चित्रपट असून येत्या १२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटासंदर्भात नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत कतरिनाने ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटाबद्दल संवाद साधला.

चित्रपट निवडताना कोणती काळजी घेतेस? या प्रश्नाचं उत्तर देताना कतरिना म्हणाली, ‘मी चित्रपट निवडताना त्याचे दिग्दर्शक आणि कथानकाला प्राधान्य देते. माझ्या मते उत्तम कथानक असलेल्या चित्रपटात काम करायला मिळणे ही कोणत्याही कलाकारासाठी मोठी गोष्ट आहे. तसेच दिग्दर्शक हा जहाजाचा कप्तान असतो. त्यामुळे चित्रपट कसा तयार होणार हे कलाकारांवर नाही तर दिग्दर्शकावर अवलंबून असते. काही चित्रपट हे फक्त मनोरंजन करणारे असतात तर काही चित्रपट हे वास्तव दाखवणारे असतात. चित्रपटाच्या संहितेनुसार तो चित्रपट कसा असणार हे ठरते. एका अभिनेत्याला गंभीर आणि विनोदी दोन्ही प्रकारचे चित्रपट करता आले पाहिजे. मला दोन्ही प्रकारचे चित्रपट करण्यात रस आहे’. 

bhagya dile tu mala fame actress surabhi bhave will appear in the new series Tu Hi Re Maza Mitwa of Star Pravah
‘भाग्य दिले तू मला’ फेम अभिनेत्री झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, प्रोमो शेअर करत म्हणाली, “कलाकार म्हणून कायमच…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
ranbir kapoor lunch date with raha and alia
Video : लाडकी लेक कडेवर अन् अंबानींच्या नातीला पाहताच रणबीरने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया…; व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस
Reshma Shinde
‘रंग माझा वेगळा’मध्ये सावळ्या मुलीला का घेतलं नाही? ‘अशी’ झालेली रेश्मा शिंदेची निवड; मालिकेच्या लेखकानं सांगितलं कारण
Muramba fame shashank ketkar propose to shivani mundhekar on Aata Hou De Dhingana season 3
Video: ‘आता होऊ दे धिंगाणा ३’च्या मंचावर अक्षयने रमाला केलं प्रपोज, पण रमाने दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाली…
samantha want to be mother
अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली, “वयाचा विचार…”
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”

हेही वाचा >>> १९ वर्षी पदार्पण, ३८ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासह रोमान्स; १० वर्षात सगळे चित्रपट फ्लॉप तरी मिनिटाला कोट्यवधींचे मानधन घेते ‘ही’ अभिनेत्री

दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्याबरोबर काम करायला मिळावे यासाठी मी गेले कित्येक वर्ष वाट पाहात होते, असे सांगणाऱ्या कतरिनाने त्यांच्याबरोबर काम करताना आलेल्या अनुभवाविषयीही यावेळी सांगितले.  ‘श्रीराम राघवन माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यामुळे जेव्हा त्यांनी मला या चित्रपटाची कथा सांगितली, त्याचवेळी मी भारावून गेले होते. ‘मारिया’ हे पात्र मी साकारू शकेन हा विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला याचाही मला अभिमान वाटतो. हा संपूर्ण चित्रपट करण्याआधी त्यांनी मला ‘मारिया’ या माझ्या पात्राविषयी एक निबंध लिहायला सांगितला होता. या पात्राचा भूतकाळ काय असेल? हे त्यांनी मला विचार करून लिहायला सांगितले. आम्ही या चित्रपटासाठी काही कार्यशाळा घेतल्या, चित्रीकरण सुरू होण्याच्या आठवडाभर आधीपासूनच आमची तालीम करून घ्यायलाही त्यांनी सुरुवात केली होती. त्यामुळे प्रत्यक्ष चित्रीकरण करत असताना आपापल्या पात्रांची खोली काय आहे? ते काय विचार करतात, कसे वागतात? याविषयी पूर्ण माहिती आम्हाला होती. आणि त्यानुसार आम्ही आमच्या भूमिका केल्या’ अशी माहिती तिने दिली. 

‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट करताना इतर कोणत्याही आव्हानांपेक्षा भाषिक आव्हान अधिक होते, असे कतरिनाने सांगितले. ‘मेरी ख्रिसमस’ हा चित्रपट हिंदी आणि तमिळ अशा दोन्ही भाषेत करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही भाषेत एकाच वेळी काम करणे हे माझ्यासाठी सर्वात मोठे आव्हान होते. शिवाय, तमिळ ही माझ्यासाठी पूर्णपणे वेगळी भाषा होती आणि या चित्रपटातील काही गंभीर दृश्ये याच भाषेत करणे गरजेचे होते. म्हणून त्यावर अधिक मेहनत करावी लागली, पण दोन्ही भाषेत चित्रपट उत्तम तयार झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर सगळयांचा आवडला आहे. त्यामुळे आता मी स्वत: हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे’ असेही तिने स्पष्ट केले. 

हेही वाचा >>> ‘तू माझ्यावर किती प्रेम करतोस’, शिल्पा शेट्टीच्या प्रश्नावर पती म्हणाला, ‘७२ टक्के’, राज कुंद्राची पोस्ट पाहून तुम्हालाही येईल हसू

कतरिनाने या चित्रपटात पहिल्यांदाच दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते विजय सेतुपती यांच्याबरोबर काम केले आहे. दक्षिणेत लोकप्रिय असलेल्या विजयसारख्या कसलेल्या अभिनेत्याबरोबर काम करण्याचा अनुभवही तितकाच रंजक होता असे तिने सांगितले.  ‘मी विजयला भेटण्यासाठी खूप उत्सुक होते. आमची पहिली भेट झाली तेव्हा मी, दिग्दर्शक श्रीराम राघवन आणि विजय असे तिघे एकत्र भेटलो होतो. त्याआधी मी केवळ छायाचित्रे आणि चित्रपटातून त्याला पाहिले होते. त्याचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन माझ्यापेक्षा खूप वेगळा आहे. त्यामुळे अशा अभिनेत्याबरोबर काम करताना खूप काही शिकायलाही मिळाले आणि मजाही आली’ असे तिने सांगितले.  ‘टायगर ३’ मधील झोया आणि ‘मेरी ख्रिसमस’ मारिया ही दोन्ही पात्रे साकारल्यावर काय वेगळेपण जाणवतो? या प्रश्नाचे उत्तर देताना कतरिना म्हणाली, ‘टायगर ३’ आणि ‘मेरी ख्रिसमस’ हे दोन्ही वेगळे चित्रपट आहेत. ‘टायगर ३’ मधील झोया हे पात्र एका कणखर स्त्रीचे आहे. मनीष शर्मा यांनी उत्तम प्रकारे हे पात्र लिहिले आहे. टायगरच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच खंबीर मनोवृत्तीची नायिका साकारली. ‘मेरी ख्रिसमस’मधील मारियाचे विश्वच वेगळे आहे. तिची वेगळी कथा आहे. तिचा काही त्रास आहे जो या चित्रपटात हळू हळू लक्षात येतो. त्यामुळे या दोन्ही टोकाच्या वैविध्य असलेल्या व्यक्तिरेखा साकारण्याचा आनंदच वेगळा आहे, असे तिने सांगितले.