अभिनेत्री कतरिना कैफ ही बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आज तिचा ४०वा वाढदिवस आहे. परदेशातून भारतात येत तिने इथे स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज ती बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये सामील आहे.
कतरिना कैफने ‘बूम’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. तर त्यानंतर आतापर्यंत तिने ‘नमस्ते लंडन’, ‘तीस मार खन’, ‘एक था टायगर’ आणि ‘धूम ३’ आणि ‘जब तक है जान’ असे अनेक चित्रपट केले आहेत. सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करत कतरिना आज करोडोंची मालकीण आहे. विशेष म्हणजे ती तिचा पती विकी कौशल याच्यापेक्षाही जास्त पैसे कमावते.
कतरिना एका चित्रपटासाठी १० ते १२ कोटी मानधन आकारते. ती अनेक बड्या ब्रँडची ॲम्बेसिडरही आहे. जाहिरात करण्यासाठी देखील ती बरीच फी घेते. सोशल मीडिया पोस्ट आणि जाहिरातींमधून ती जवळपास ६ ते ७ कोटी कमावते. मुंबई तिचं स्वतःचं घर आहेच पण त्याबरोबरच लंडन आणि न्यूयॉर्कमध्येही तिची आलिशान घरं आहेत. कतरिनाच्या मुंबईच्या फ्लॅटची किंमत साधारण ८ कोटी आहे. याचबरोबर तिच्याकडे ऑडी, मर्सिडीज अशा महागड्या गाड्याही आहेत.
हेही वाचा : Video: ठाण्यात येताच विकी कौशलने चाहत्यांशी मराठीतून दिलखुलासपणे साधला संवाद, म्हणाला…
२०१९ मध्ये कतरिनाने तिचा स्वतःचा मेकअप ब्रँड Kay Beauty लाँच केला. तिच्या या ब्रँडला खूप चांगला प्रतिसादही मिळताना दिसतो. या ब्रँड मधूनही ती बरेच पैसे कमावते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कतरिनाची एकूण संपत्ती २३० कोटींच्या आसपास आहे. तर तिचा पती विकी कौशल याची संपत्ती १६० कोटींच्या आसपास आहेत.