दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या त्यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. १६ जूनला प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. हैदराबादमध्ये ‘आदिपुरुष’च्या ट्रेलरचे खास स्क्रीनिंग करण्यात आले होते. ट्रेलर लॉंचिंगवेळी चित्रपटातील प्रत्येक कलाकार कथेला आणि पात्राला अनुसरून पारंपरिक पोशाख परिधान करून आले होते. या वेळी अभिनेत्री क्रिती सेनॉनने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमात क्रितीच्या लूकची चांगलीच चर्चा झाली. क्रितीने या वेळी पांढऱ्या आणि सोनेरी रंगाची साडी नेसली होती. ही साडी खूप खास असल्याचे सांगण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘द केरला स्टोरी’ चित्रपट करमुक्त करावा”, विश्व हिंदू परिषदेचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना पत्र

‘आदिपुरुष’च्या ट्रेलर लॉन्चिंग कार्यक्रमात क्रितीने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती. पांढऱ्या साडीवर सोनेरी रंगाची बॉर्डर पाहायला मिळत आहे. त्यामुळे या साडीचे सौंदर्य आणखीनच वाढले आहे. ही साडी केरळ कॉटन फॅब्रिकपासून बनवण्यात आली होती. त्यात २४ कॅरेट सोन्याच्या खादी ब्लॉक प्रिंट्स बनवल्या होत्या. या साडीत क्रिती खूपच सुंदर दिसत होती. क्रितीने नेसलेली साडी २४ कॅरेट सोन्यापासून बनवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

क्रितीचा हा पारंपरिक आणि साधा लूक चाहत्यांची मने जिंकत आहे. डिझायनर अबू जानी संदीप खोसलाने सोशल मीडियावर फोटो शेअर करून क्रितीच्या या लूक आणि साडीबद्दल माहिती दिली आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंचिंगचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ट्रेलरच्या स्क्रीनिंगचे आयोजन एका चित्रपटगृहात करण्यात आले होते. या ठिकाणी चाहते, मीडिया आणि चित्रपटातील इतर सहकाऱ्यांनी आधीपासूनच गर्दी केली होती. यानंतर आलेल्या क्रिती सेनॉनला संपूर्ण चित्रपटगृहात बसण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती, परंतु जराही विचार न करता ती थेट जमिनीवर बसली. यानंतर त्या ठिकाणी उपस्थित लोकांनी तिला खुर्चीवर बसण्याची विनंती केली, पण तिने जमिनीवर बसणे पसंत केले आणि सर्वांची मने जिंकली. क्रितीचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नेटकरी तिचे कौतुक करीत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actress kriti sanon wears 24 carat gold khadi block prints saree during adipurush trailer launch event dpj