ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. परंतु हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात निराशा झाल्याचं दिसत आहे. या चित्रपटात दाखवल्या गेलेल्या दृश्यांवर प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. पण तरीही हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. आता या चित्रपटात सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री क्रिती सेनॉन हिने केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.

या चित्रपटात दाखवले गेलेली दृश्यं, यातील संवाद, कलाकारांचा अभिनय हे सगळंच प्रेक्षकांना अजिबात आवडलेलं नाही. त्यामुळेच या चित्रपटावर जोरदार टीका होत आहे. पण तसं असूनही या चित्रपटाने तीन दिवसांतच जगभरातून ३०० हून अधिक कोटींची कमाई केली. यानिमित्त क्रितीने एक पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा : ‘आदिपुरुष’ चित्रपटासाठी मिळालेल्या मानधनाबाबत देवदत्त नागेचा मोठा खुलासा, म्हणाला…

या चित्रपटाने पहिल्या दिवशी जगभरातून १४० कोटी, दुसऱ्या दिवसापर्यंत हा आकडा २४० कोटींवर जाऊन पोहोचला. तर या चिरपटणे तीन दिवसांत जगभरातून एकूण ३४० कोटींचा गल्ला जमवला. आज क्रितीने या चित्रपटाने जगभरातून ३४० कोटी कमावले हे एका फोटोमधून स्पष्ट केलं. हा फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, “जय श्रीराम!”

हेही वाचा : “पहिल्या दिवसापासूनच प्रभास मला…,” ‘आदिपुरुष’मध्ये लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सनी सिंगने केलेलं वक्तव्य चर्चेत

आता तिच्या या पोस्टवर आता नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. त्यावर कमेंट करत अनेकांनी तिला पुन्हा ट्रोल केलं आहे. तर दुसरीकडे तिचे चाहते तिच्या कामाचं कौतुक करत आहेत.

Story img Loader