काही दिवसांपूर्वीच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. आलिया भट्ट आणि रणवीर सिंह यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. त्यांच्याबरोबरच या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे. मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटात रणवीर आणि आलिया बरोबरकाम करण्याचा तिचा अनुभव कसा होता हे तिने शेअर केलं आहे.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात दमदार कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटात मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग हिने रणवीर सिंहच्या आईची भूमिका साकारली आहे. तिचे रणवीर आणि आलिया बरोबर बरेच सीन्स आहेत. कलाकार म्हणून ते कसे आहेत हे आता क्षितीने एका मुलाखतीत सांगितलं.
ती म्हणाली, “रणवीर हा खूप मोठा स्टार आहे. मी असं अनेक कलाकारांच्या बाबतीत पाहिलं आहे जे इतके मोठे स्टार्सही नाहीत. कधी कधी असं होतं की तो सीन समोरच्या व्यक्तीचा असतो, तो सीन आपला नसतो. पण रणवीर हा खूपच समजूतदार अभिनेता आहे. त्याला नेहमी माहित असतं की हा समोरच्या कलाकाराचा सीन आहे आणि यात आपल्याला एक पाऊल मागे यायचं आहे. तो सह कलाकार म्हणून जितका चांगला आहेत तितकाच माणूस म्हणूनही खूप चांगला आहे. रणवीर आणि आलियाच्या बाबतीतही मला ही गोष्ट निश्चितच सांगावीशी वाटते की ते फक्त स्वतःच काम बघत नाहीत. ते सीनचा विचार करतात. मी स्टार आहे त्यामुळे सीनमध्ये मीच झळकणार असं त्यांच्या बाबतीत एक टक्काही कधी झालं नाही.”
हेही वाचा : Video: “काम तर करत नाही फक्त…,” ‘त्या’ कृतीमुळे रणवीर सिंग ट्रोल
दरम्यान, या चित्रपटातील क्षिती जोगचं काम सर्वांनाच खूप आवडलं आहे. सोशल मीडिया वरून सर्वजण क्षितीज भरभरून कौतुक करत आहेत.