अभिनेत्री माधुरी दीक्षित कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायमच चर्चेत असते. तसेच पती श्रीराम नेने यांच्याबरोबरचे व्हिडीओही ती सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसते. श्रीराम नेनेही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी शेअर केलेला त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील त्यांचा लूक पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.
आणखी वाचा – मला पुरुषाची गरज नाही म्हणत स्वतःशीच लग्न करणारी अभिनेत्री गरोदर? फोटो शेअर करत म्हणाली, “मी स्वतःच…”
माधुरीच्या दिवसाची सुरुवातच व्यायामाने होते. म्हणून आजही ती इतकी फिट व सुंदर दिसते. सोशल मीडियावर तिच्या फिटनेसचं कौतुक होताना दिसतं. पण आता श्रीराम नेनेही तितकेच फिट असल्याचं दिसून आलं आहे. तसेच त्यांचा फिटनेसही कौतुक करण्यासारखंच आहे.
पाहा व्हिडीओ
श्रीराम यांनी त्यांच्या जीममधील शर्टलेस व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते आपला फिटनेस दाखवताना दिसत आहेत. तसेच विविध पोझ देत आपली शरीरयष्टी किती परफेक्ट आहे हे श्रीराम दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्या फिटनेसचं भरभरून कौतुक केलं आहे. तुमचा फिटनेस अगदी कमाल आहे, तुम्ही खूप छान दिसत आहात अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. आज त्यांच्या बदलत्या लूकचं कौतुक होताना दिसत आहे.